गरबा गुजरातचा पारंपरिक नृत्यप्रकार, पण महाराष्ट्रातही बऱ्यापैकी रूजलाय. महाराष्ट्रीयन तसे ऊत्सवप्रियचं! गेल्या काही दशकांत मार्केटिंगच्या प्रभावामुळे मोठ्या शहरांत गरबा हा इव्हेंट आणि पैशाचा खेळ झाला आहे. तरीही बऱ्याच संस्था, सोसायटी अजूनही आनंदासाठी गरबा खेळतात.
माझ्या गरबाच्या आठवणी Once Upon Time च्यापण पलिकडे आहेत. एकतर मला कोणताच डान्स जमत नाही. (अंगण सरळ वाकडं कसही असलं तरी) पौराणिक कथांमध्ये वृदांवनात कृष्ण गोपिकांच्या रास गरबाचा उल्लेख आढळतो. मी पण लहानपणी वेशभूषा स्पर्धेत कृष्ण झालो होतो, एवढ्या एका क्वालिफिकेशनवर मला गरबा सहज जमून जाईल अस वाटल होतं. पण महाराजा, गरबा बघायला जेवढा सोप्पा वाटतो तेवढा खेळायला सोप्पा नसतो हो!
युवा वर्गासाठी गरबा हि एक पर्वणी असते. बरीच प्रेमप्रकरणं मार्गी लागतात. तारूण्याच्या जोशात मीपण एक दोन वेळा प्रयत्न करून पाहिला... गरबा खेळण्याचा! पण माझ्यामुळे बाकीचेपण चुकायला लागले. मग खेळण्याचा नाद सोडून फक्त बघण्यावरच समाधान! गरबाच्या तालावर दिलखेचक नृत्य करण हि एक कला आहे. (माझी मजल फार फार तर वरातीतला डान्स). नवरात्रीच्या काळात तेव्हा मित्रांबरोबर वेगवेगळ्या मंडपात जाऊन गरबा पहाणे ही वेगळीच मज्जा असे. आतासारखे वेळेच बंधनही नसे. "अरे ती बघ तुझ्याकडेच बघतेय. ऊद्या तूपण खेळ गरबा" अस सांगून एखाद्या मित्राचा बकरा बनविणे हा पण एक टाईमपास चाले.
काही वर्षांपूर्वी आत्तासारखा डिजेचा दणदणाट नव्हता, पण बैंजो, ताशा आणि ढोल एवढ्या मोजक्या वाद्यांवर वातावरण भारून टाकले जातं असे. सुहाना सफर और ये मौसम हसीं हे गाण हमखास असायचं. (शाळेत असताना ह्या गाण्यावर आमच्या वर्गाने डिस्को क्रिकेट सादर केल होतं ) त्या काळात वाजणारी सदाबहार दांडियागीतं ... 'मै तो भूल चली बाबुल का देस', 'आधा है चंद्रमा रात आधी', 'मै तो आरती उतारू रे संतोषी माता कि', 'हे नाम रे सबसे बडा तेरा नाम ओ शेरोंवाली'...अजूनही मोहीत करतात.
सध्या संतूवाणी आयुष्याच्या सफरीत अशा टप्प्यावर आहे जिथे गरबाच्या तालावर नाचण्यापेक्षा बायकोच्या तालावर नाचणे सोप्पं वाटतयं.😉
दयानंद2 years ago
मनीषा2 years ago
प्रभा3 years ago
संध्या3 years ago
गौरी3 years ago
चारू3 years ago
विनायक4 years ago
नीना4 years ago
रविदत्त4 years ago
गीता4 years ago
संजय डी.4 years ago
दयानंद4 years ago
विजय4 years ago
संजय के.4 years ago
समीर4 years ago
वैशाली4 years ago
प्रशांत4 years ago
शैलेश डी.4 years ago
राजश्री4 years ago
संतोष एम.4 years ago
प्रसाद4 years ago
नेत्रा4 years ago
सुनील4 years ago
दिलीप4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा