डॉक्टर राजश्री मयेकर (हिर्लेकर) - मधली सुट्टी ग्रुपमधील साडे-तीन डॉक्टरांपैकी एक. असं म्हणतात डॉक्टरपेक्षा कंपाउंडर लोकांना जास्त कळतं 😉. तरीही राजश्री फार्मसी विषयाशी संबंधित असल्याने तिला दोन-चार औषधांची नावे माहित असतील, असे गृहीत धरायला हरकत नाही. शाळेत असल्यापासूनच ती स्कॉलर होती. आमच्या दहावीच्या बॅचची टॉपर. इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप क्लासेसना यायची त्यामुळे लक्षात राहिली. (नाहीतर कन्याशाळा म्हणजे माझ्यासाठी परग्रह 👽 )
आता मधली सुट्टीमुळे राजश्रीची बऱ्यापैकी ओळख झाली आहे. साधा सरळ स्वभाव, जोपर्यन्त बोलत नाही तोपर्यन्त मितभाषी. 😷 बोलण्यावरून आठवलं, माझा मुलगा निशांत दहावी पास झाल्यानंतर त्याच्या अभिनंदनासाठी राजश्रीने कॉल केला होता. निशांत पहिल्यांदाचं तिच्याशी बोलला आणि तिचा कॉल संपल्यावर त्याने मला विचारलं, "पप्पा त्या टीचर आहेत का?"
विवेकानंद एज्युकेशनच्या फार्मसी कॉलेजात राजश्री प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. अधूनमधून कॉलेजमध्ये त्यांच्या टीमला मिळालेल्या यशाचे फोटो व्हाट्सअप वर पोष्ट करते, म्हणजे बहुतेक विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका असावी आणि शिक्षणातली हुशारी अजूनही टिकवून ठेवलेली दिसतेय. 👍 (बाकी व्हाट्सअप हुशारीतं आमच्यासारखे आम्हीचं ) राजश्रीचे सध्याचे निवासस्थान मुलुंड उपनगर (ग्रुपमधील मान्यवरांच्या वास्तव्याने नावारूपास आलेले) जिथे आपण २५ डिसेंबरला स्नेहसंमेलन २०२१ आयोजित केले होते! पण राजश्री अनुपस्थित होती 😍
राजश्री कोकणातलीचं असल्याने तैलबुद्धी उपजतच आहे, त्याचा परिचय कधीकधी ग्रुपवरीली तिच्या कंमेंट देऊन जातात. राजश्री, तुला चांगले आरोग्य, सुख संपत्ती लाभो हीच वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !!!💐🎂
श्रीराम2 years ago
विनायक2 years ago
अवधूत2 years ago
वैशाली2 years ago
दयानंद2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा