पहिल्यांदा तुला धन्यवाद ! यासाठी की तू आणि रवीदत्तने ह्या ग्रुपच्या स्थापनेत पुढाकार घेतलात. दुसरं म्हणजे तुझ्याबद्दल फारशी माहिती नसताना तुझ्याविषयी लिहिण्याच धाडस करतोय.
शाळेत असताना माझ्या स्मरणात असलेल्या मुलींच्या नावांमध्ये तुझ नाव नव्हतं. काही मित्र म्हणतात, तू होतीस आपल्या शाळेत म्हणजे असावीस! (भविष्यात सोशल मिडीयावर कन्याशाळेची भेट होणार आहे हे माहित असतं तर मी मुलींची नावं तरी पाठ केली असती) त्यामुळे मला, तुझी जी काही ओळख झालीय ती मधली सुट्टी ग्रुप स्थापन झाल्यानंतरच. पण अजूनही 'अग नीने' म्हणण्याइतपत ओळख नाही. असो!
मधली सुट्टीतच तुझ्या बहुआयामी उत्साही व्यक्तिमत्वाची ओळख झाली. सुरुवात इंग्रजीवरील प्रभुत्वापासून झाली. काही वेळा तूं इंग्रजीत लिहलेल्या पोष्ट वाचताना गुगलवर शब्दार्थ शोधावा लागत असे. (कदाचित माझं इंग्रजी प्रायव्हेट लिमिटेड असल्याने असेल) त्यानिमित्ताने माझ्याही शब्दसंपत्तीत वाढ झाली. नीनाला चित्रकले तील विविध प्रकार बऱ्यापैकी येतात. तिला गायनकला देखील अवगत आहे. शाळेत असताना नीना अभ्यासात किती हुशार होती, ते मात्र माहित नाही. तसही शाळेतल्या पुस्तकांतील हुशारी आयुष्याच्या शाळेत फारशी उपयोगी पडत नाही. लग्नानंतर तू सासरच्या पिढीजात व्यवसायात बिझनेस वुमन ही भूमिकादेखील पार पाडलीस.
भूमिकेवरून आठवलं, गीताबाईंनी ग्रुपवर घेतलेल्या अभिनय कार्यशाळेत, तू सादर केलेला इंग्रजी गब्बर अफलातून होता. मुळात इंग्लिश मिडियमचा गब्बर ही कल्पनाच कमाल होती.
योगायोगाने मला समजलंय तुला योगाभ्यासात देखिल कौशल्य प्राप्त आहे. विविध क्षेत्रातील तुझ्या योगदानाबद्दल 'मधली सुट्टी भूषण' पुरस्कारासाठी तुझ नामांकन केल जाईल. पण तुला पुरस्कार मिळेलचं अशा भ्रमात राहू नकोस, ह्या ग्रुपवर अजूनही बरेच दिग्गज कलाकार आहेत. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
विनायक3 years ago
संजय डी.3 years ago
विलास के.3 years ago
गणेश3 years ago
वसंत3 years ago
प्रसाद3 years ago
गीता3 years ago
रविदत्त 3 years ago
वर्षा एस.3 years ago
सुनील3 years ago
प्रशांत3 years ago
समीर3 years ago
निकेता3 years ago
दयानंद3 years ago
प्रदीप3 years ago
राजश्री3 years ago
नेत्रा3 years ago
अभिजित3 years ago
दीपक3 years ago
महेश3 years ago
संजय के.3 years ago
अनिता3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा