प्रशांत, मित्रा तू शांत बसायचच नाही अस ठरवलयसं जणू! कधी गाणं, कधी अभिनय आणि आता तर चक्क नृत्याविष्कार!!! पन्नाशीतही तू दाखवलेल्या एनर्जीला दाद द्यावी लागेल.
आपले बाकीचे समवयीन सवंगडी पण कार्यालयीन काम सांभाळून काही ना काही करत असतात. पण त्याला फारशी ऊर्जा लागत नाही. जसं की कुठल्यातरी कार्यक्रमला उपस्थित रहाणे, चिंतन बैठक, मित्रांबरोबर वडापाव खाणे, पुण्याच्या शेतात नुसतेच उभे रहाणे किंवा झाडावरून पडलेले बोंडू गोळा करणे. 😝
स्टेजवर एखाद्या गाण्यावर समूहनृत्य सादरीकरण सोपी गोष्ट नाही. बरीच रिहर्सलही करावी लागली असेल. वरात-डान्समध्ये सगळ कसं उत्स्फूर्त असतं. तालीम करावी लागत नाही. एनर्जी कमी झाली तर एनर्जी ड्रिंक्स असतात. पण तू जे करतोयस त्याला मनापासून आवड आणि इच्छाशक्ती हवी. एक गोष्ट मात्र तुला मान्य करावी लागेल, तू जी कलाकारी दाखवतोयस त्यात तुझ्या पत्नीचा पाठिंबा ही मौल्यवान गोष्ट आहे. वहिनींच्या जीववार तर तू कलागुण उधळतोयस 😍
माझ्या मनमोराने कधी असा नृत्याविष्कार करण्याची इच्छा व्यक्त केली तर ...
"नसत्या फंदात पडू नका. चालताना धडपडता. आता ह्या वयात नाचताना हातपाय मोडला तर केवढ्याला पडेल? त्यापेक्षा बाजारात जाऊन भाजी आणा."
असा प्रेमळ सल्ला आमच्या सौभाग्यवतींकडून दिला जातो. मग आमचा मनमोर चूपचाप पिसारा म्यान करून टिव्ही बघत बसतो. असो! बऱ्याच मोरांची हीच परिस्थिती आहे.
पुनश्च अभिनंदन!! शांत बसूचं नकोस असाच हसत खेळत नाचत रहा! 👍
समीर4 years ago
विनायक4 years ago
प्रसाद4 years ago
प्रशांत4 years ago
महेश4 years ago
वैशाली4 years ago
विजय4 years ago
निकेता4 years ago
प्रदीप4 years ago
विनय4 years ago
दयानंद4 years ago
विलास पी.4 years ago
विलास के.4 years ago
रविदत्त4 years ago
सुनील4 years ago
शैका4 years ago
वर्षा 4 years ago
अभय4 years ago
राजश्री4 years ago
संजय के.4 years ago
विकास4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा