माझ्या मते आपल्या मधली सुट्टी ग्रुपवर सगळेच स्वप्नाला ओळखतात. म्हणजे निदान आठवत तरी असेल. स्वप्नाची आमच्यासाठी मुख्य ओळख स्वप्निल वाळिंजकरची बहिण हीच होती. स्वप्नील म्हणजे आमच्या शाळेतील एक स्कॉलर जो दहावीला मेरिट लिस्टमध्ये आला होता. स्वप्निलची बहिण म्हणजे थोडीफार हुशार असणारचं. पण ती चक्क डॉक्टर झालीयं म्हणजे फारच हुशार असणार!
तेव्हा साधारणतः हुशार विद्यार्थी रूपारेल कॉलेजला जात असतं. (असाधारण हुशार इतर कॉलेजेस् ना जात) विज्ञान शाखेनंतर मेडिकलला प्रवेश. वैद्यकीय शाखेतील दंतचिकित्सक ह्या विषयात पदवी प्राप्त. दंतचिकित्सक म्हणजे आपण मराठीत ज्याला डेन्टिस्ट म्हणतो.
स्वप्नाचा मधली सुट्टीतील वावर अगदी अल्प प्रमाणात असतो. त्याचे कारणही तसेच महत्त्वाचे आहे. (डॉक्टरी पेशा) जेव्हा आपण ग्रुपवर हास्यविनोद करून दात काढत असतो, तेव्हा कदाचित तीदेखील दात काढत असू शकते....एखाद्या पेशंटचे! तरीही मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस, कोणाचे अभिनंदन अशा वेळी ग्रुपवर आवर्जून उपस्थिती दाखवत असते. हे ही नसे थोडके!
प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या नाशिक शहरामध्ये सध्या वास्तव्य. स्वप्ना पुढच्या गेट टूगेदर ला उपस्थित असेल अशी अपेक्षा!👍
वसंत4 years ago
निकेता4 years ago
प्रसाद4 years ago
अवधूत4 years ago
नेत्रा4 years ago
राजश्री4 years ago
विनायक4 years ago
प्रशांत4 years ago
संजय के.4 years ago
सुनील4 years ago
गीता4 years ago
अनिता4 years ago
नीना4 years ago
समीर4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा