हल्ली भैय्या म्हटलं की कसं परप्रांतीय वाटतं, त्यात आडनाव पण यादव. शालेय जीवनात म्हणशील तर केवळ इमारत क्रमांक ११ ची गॅंग म्हणते, "तू आपल्या वर्गात होतास" म्हणून आठवतंय. आपली शाळासुद्धा तू लवकरच सोडलीस. (नशीब शिक्षण नाही सोडलंस) बरं, शाळा सोडून जाण्यापूर्वी काही लक्षणीय कामगिरीदेखील नाही. तसं मीही दहावीपर्यंत शाळेत राहून फारसे काही झेंडे नाही लावले. असो! काहींनी मात्र अर्ध्यावर शाळा सोडूनसुद्धा अमीट ठसा उमटवलाय!👍
शाळूसोबतींच्या मोजक्या गेट-टुगेदरमधून आपली ओळख वाढली. डावे-उजवे करता करता ती वृद्धिंगत झाली. 'शोला जो भडके' गाण्यावर माधवासोबत तू सादर केलेला नृत्याविष्कार अजूनही लक्षात आहे.(👆 वरिल व्हिडिओत पहा). इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीदशेतील प्रसादच्या कृष्णलीलांचा साक्षीदार असलेला एक यादव. गझल आणि मद्यावर असलेले तरल प्रेम. इतरही कोणावर प्रेम केले असल्याचा ऐतिहासिक पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही 😍.
केवळ 'सुला वाईन्स' नाशिकमध्ये आहे, म्हणून नाशिककर झालेला 😉. परंतु पुणे आणि मुंबईशी मैत्रीबंध टिकवून असणारा. त्याचा 'बर्थ डे' 'ड्राय डे'च्या दिवशी असणे हा एक दैवदुर्विलास! सोमरसासोबत अभिला इतिहासात विशेष रस आहे. तुझ्या 'भैय्या' ह्या नावाचा इतिहासदेखील मला विश्वसनीय सूत्रांकडून समजला आहे .😀
पन्नाशी पार झाली तरी मनाने तरुण असणारा अभिजित. शाब्दिक रहदारीत 'डावीकडून चला' ह्या नियमांचे पालन कटाक्षाने करणारा. ग्रुपवरील चर्चेत तोंडातून ब्र काढू नकोस असे सांगितले असतानासुध्दा, मधल्या सुट्टीत आमची पळापळ घडवून आणणारा महाभाग!😃 पण अशी पळापळ अधूनमधून आवश्यक असते, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा टिकून रहाते.
अभिजीत, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा! चिअर्स !!!🍻राजश्री3 years ago
गणेश5 years ago
संजय डी.5 years ago
विलास के.5 years ago
अभिजित5 years ago
दयानंद5 years ago
रविदत्त5 years ago
अवधूत5 years ago
प्रशांत5 years ago
अनिल5 years ago
प्रकाश5 years ago
विनायक5 years ago
अभय5 years ago
शैलेश डी.5 years ago
सुनील5 years ago
समीर5 years ago
प्रसाद5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा