त्या म हान आत्म्याचं नाव लिहावयाचीदेखील माझी पात्रता नाही. त्या नामाशी मी सदैव नतमस्तक आहे. अशा साक्षात्कारी व्यक्तींचा वाढदिवस नसतो तर प्रकटदिन असतो. असं म्हणतात, तो पुरुष नाही तर... महापुरुष आहे. 🙏जगाच्या कल्याणहेतू ह्या पृथ्वीतलावर तो प्रकट झाला. आपले परमभाग्य म्हणून आपणांस त्याचा परिसस्पर्श लाभला. पण दुर्दैव ! आपल्या गंजलेल्या लोखंडाचं काही सोनं झालं नाही! शालेय जीवनात तो आपल्यासारखाच सामान्य विद्यार्थी होता. तदनंतर मात्र तो संसाररूपी भवसागर लीलया तरला (आपण अजून गंटागळ्या खातोय ) 😭
अशी दंतकथा😬 सांगितली जाते कि काही वर्षांपूर्वी त्याला दिव्यज्ञान प्राप्ती झाली आहे. कोणत्या दिनी? कोणत्या क्षणी? कुठे? कसं? असे मूढतादर्शक प्रश्न विचारू नका. 'नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये' असं म्हणतात, ते उगीच नाही. ह्या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यात आपल्यासारख्या पामरांचं अस्तित्व ते काय? तो मात्र षडरिपुंना बगलेत दाबून सर्वत्र संचार करत असतो. चार बुकांचं पुस्तकी ज्ञान घेऊन आपण स्वत:चा अहं कुरवाळत बसतो. त्याच्यासारखं नि:स्वार्थी, निर्मोही, निरीच्छ, निर्लेप, नि:संग, निगरगट्ट जगता आलं पाहिजे.👍
विविध क्षेत्रातील मान्यवर तुम्ही पहिले असाल, परंतु सूक्ष्मावलोकन केल्यास तुमच्या ध्यानात येईल तो जवळपास सर्वज्ञ आहे. लेखन,काव्य, गायन,अभिनय, चित्रकला, अभियांत्रिकी (सर्व शाखा), मद्यनिर्मिती, गणित, इतिहास, भूगोल, ना.शास्त्र ...अनंत विषयांत त्याची मुशाफिरी सहजगत्या सुरु असते. गणेशास चौसष्ट कलांचा अधिपती म्हणतात. ह्यास तर जाहिरात ही पासष्टावी कलादेखील अवगत आहे. तुम्ही कदाचित आश्चर्याच्या चक्कीत पडला असाल की मी इतक प्रभावी कस काय लिहतोय? तर मित्रांनो मी फक्त टंकतोय, त्याचा आत्मा माझ्या आत्म्याशी एकरूप झालाय आणि तोच माझ्या लेखणीतून प्रसवतोय. ही ईश्वरी रचनाच असावी 😊
विजय2 years ago
वैशाली2 years ago
गीता2 years ago
निकेता2 years ago
दयानंद2 years ago
अवधूत2 years ago
गणेश2 years ago
समीर2 years ago
नेत्रा2 years ago
संजय के.2 years ago
राजश्री2 years ago
विलास के2 years ago
वर्षा2 years ago
सुनील2 years ago
अभिजीत2 years ago
प्रदीप2 years ago
अनिल2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा