आज आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. कालिदास म्हटलं कि मेघदूत आठवणारच. मेघदूत हे संस्कृत काव्य कालिदासाने लिहले, एवढेच बऱ्याचजणांना माहित असते. मलादेखील एवढंच माहित होतं. अधिक शोधाअंती माहित झालेला मेघदूताचा सारांश असा आहे.
कुबेराच्या अलकापुरी नगरीत एक यक्ष राहत असतो. त्याच्या कामातील काही चुकीमुळे कुबेर त्याला एक वर्षासाठी अलकापुरीतून हद्दपार करतो व रामगिरी पर्वतावर पाठवतो. वर्षाऋतूमध्ये त्या यक्षाला त्याच्या अलकापुरीतील प्रेमिकेची आठवण सतावत असते. आषाढाच्या पहिल्या दिवशी विरह-व्याकुळ झालेला यक्ष आकाशातील मेघालाच आपला प्रेमदूत बनवून अलकापुरीला जायला सांगतो. आपला प्रेमसंदेश मेघामार्फत प्रेमिकेपर्यन्त धाडण्यासाठी यक्षाने केलेले हे प्रयत्न कालिदासांनी खंडकाव्यात मांडले आहेत.
हे ज्ञान मी माझ्या इंग्रजी माध्यमात जाणाऱ्या मुलाबरोबर शेअर केलं. त्यानंतर मेघदूतम वर आमच्या दोघात ग्रुप डिस्कशन झालं.
पहिल्याच यक्षप्रश्ना पासून सुरुवातग्रुप डिस्कशन समाप्त. मी गॅलरीत आलो आणि आषाढातल्या मेघांमध्ये काही डेटा दिसतो का बघू लागलो.😂
गणेश3 years ago
नेत्रा3 years ago
विनायक3 years ago
रविदत्त3 years ago
राजश्री3 years ago
विलास पी.3 years ago
दयानंद3 years ago
प्रशांत3 years ago
गीता3 years ago
सुनील3 years ago
अभिजित3 years ago
प्रसाद3 years ago
नीना3 years ago
महेश3 years ago
संजय के.3 years ago
वर्षा डब्ल्यू.3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा