सायमन फर्नांडीस, नाव इंग्रजी आहे पण पक्का मराठी ! म्हणजे ह्याला मराठी बोलताना ऐकलं तर तुम्हाला वाटेल हा फर्नांडीस आहे कि फडणवीस? 😍 श्री. फर्नांडीस हे आमच्या इमारतीतील जुने रहिवाशी. आता त्यांचं कुटूंब बोरिवली उपनगरात स्थायिक झालं आहे आणि सध्या सायमन नोकरीनिमित्त गोव्यात आहे. म्हणजे नोकरी आणि पिकनिक एकत्रच. एकदम सुशेगात!
आमचं बालपण चाळसंस्कृतीत गेलं. आणि हो, त्याकाळी मोबाइल, सोशल मीडिया वगैरे प्रकार नव्हते. खेळ, गप्पा-गोष्टी, मनोरंजन सगळं स्वत:लाच शोधावं लागे. त्याबाबत आम्ही आत्मनिर्भर होतो. आता जवळपास सगळंच ऑनलाइन मिळतं. सायमन मला पाच-सहा वर्ष सिनियर. क्रिकेट, कॅरम ह्या खेळात पारंगत होता. आमच्या क्रिकेट टीमचा कॅप्टनही होता. त्याच्याकडे उत्तम नेतृत्वगुण, संभाषणकौशल्य आहे. अभ्यासात सामान्यच होता पण बाकी बाबतीत चलाख होता. ज्याला इंग्रजीत स्ट्रीटस्मार्ट हा छान शब्द आहे.
सायमनसोबत जोडलेल्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत... क्रिकेट मॅचेस, गच्चीवरील धमाल, होळी, इमारतीची महापूजा (चहासाठी ठेवलेलं दूध पिऊन गेलेला इंग्लिश बोका ). तेव्हा आमच्या बिल्डिंगच्या छोट्याशा जगात तो आमचा लीडर होता, हल्लीच्या भाषेत आम्ही जुनियर त्याला फॉलो करायचो. सायमन स्वतः मात्र राजेश खन्नाचा फॅन आहे आणि उंची वाईन्सचासुद्धा.
जगदिश 3 years ago
प्रभा3 years ago
सायमन3 years ago
महेश3 years ago
उदय 3 years ago
अजित3 years ago
प्रतिमा3 years ago
विकास 3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा