सुनीलने एकदा कधीतरी संजयला कर्मयोगी म्हणून संबोधलं होतं. माझ्यामते तेच संजयच सुयोग्य वर्णन आहे. म्हणजे अगदीच पूर्ण कर्मयोगी नाहीतरी निदान सेमी-कर्मयोगी म्हणावयास काहीच हरकत नाही. बाकी आता वाढदिवसा निमित्त माझ्या लेखणीत सापडलायं तर मला माझे कर्म 📌 करायला हवे.
संजय म्हणजे पुणेरी विनोद करण्यासाठी आपल्याला सापडलेला हक्काचा बकरा (खरं म्हणजे एडका... डावीकडून धडका मारणारा). मूळचा मुंबईकर पण सध्या पुण्याचा ग्रीनकार्डधारक. पुण्यापासून बारामती जवळ असल्याने, ⏰ घड्याळकाकां वरील त्याची विशेष भक्ती दिसून येते. असो!
ऑनलाइन पीडीएफ युगातदेखील 📚 पुस्तके विकत घेऊन वाचन करणारा जबरदस्त वाचनवेडा.त्याच्या ज्ञानाची चमक आपण वेळोवेळी ग्रुपवर पाहतचं असतो. मराठी भाषेवरील त्याचं प्रभुत्व वादातीत आहे. (त्याच संस्कृतही चांगल आहे असं समजू, कारण ते आपल्याला समजत नाही) त्याचा वाचनाचा आवाकाही प्रचंड आहे. संतसाहित्य, कविता, गझल, इतिहास, सिनेमा, समाजकारण, राजकारण ... विनाकारण अशा वैविध्यपूर्ण विषयांचे वाचन त्याच्या विद्वतेत भर घालत असते. व्हा-अप युनिव्हर्सीटीच गाईड न वापरता, स्वत:चा अभ्यास स्वत: करणारा. शाळेत असताना तो हुशार पण दाणगट, मस्तीखोर विद्यार्थी होता. आताही सगळे गुण तसेच आहेत फक्त वयोमानानुसार दंगामस्तीला मर्यादा आल्यायत.
संजय नावासोबत दिव्यदृष्टीही लाभलेली आहे. त्यामुळे तो सामान्य दृष्टी पलीकडचे पाहू शकतो (असं त्याला वाटतं 😉) पुणेकर झाल्यामुळे त्यास आयुष्याचे काटेकोर नियोजन करण्याची सवय लागली आहे. उदा. संजय अन् त्याची लेक गायत्री यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. हा योगायोग नसून दिव्यदृष्टीने केलेले काटेकोर नियोजनच असावे. 😍
संजय व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर अन सोबत हौशी शेतकरीसुद्धा. शेतीकाम मात्र एकदम परफेक्टशनिष्ट सारख. एवढं की ह्याने शेतात भात पेरला तर भाताचचं पीक येणार. अगदी त्याने शेतात ज्या झाडावर 'आंबा' असं लिहलयं त्या झाडाला आंबेच लागणार.🥭
गेल्या काही वर्षांपासून संजयच्या सौजन्याने😘 (पुणेकर आणि सौजन्य ?) येणारे पुणेरी उटणे आम्हां मित्रांची दिवाळी सुगंधीत करते. त्या उटण्याचा सुगंध काही दिवसांनी उडून जातो. परंतु मैत्री-परिमल मात्र मित्रांच्या मनात कायम दरवळत असतो! 💞 मित्रा, तुला आणि गायत्रीला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
सुनील3 years ago
विलास पी 3 years ago
विजय 3 years ago
अभिजीत 3 years ago
गणेश 3 years ago
नरेश3 years ago
प्रशांत3 years ago
दयानंद3 years ago
शैका3 years ago
संजय के3 years ago
राजश्री3 years ago
नेत्रा3 years ago
संजय डी3 years ago
प्रसाद3 years ago
सुरेश3 years ago
समीर3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा