आपल्याकडे जे दोन संजय आहेत त्यातील हा मुंबईकर संजय के. आपल्या ग्रुपचा पोष्टर बॉय. एका मिनिटात ग्रुपवर जास्तीत जास्त मेसेजेस् पोष्ट करण्याचा जागतिक विक्रम संजयच्या नावावर आहे. (असा एक व्हाट्सएप मेसेज मला आला होता. 😊) ग्रुपला नेहमी व्यस्त ठेवण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्याच मतं मात्र वाघाला असतं बहुतेक.
मित्रमैत्रिणींवर मनापासून प्रेम असल्याने त्याच्याकडे असलेले सर्व मेसेज तो आपल्यासोबत शेअर करत असतो. कोणाला आवडो न आवडो! 😘 ह्यातून त्याची दानशूर, निःस्वार्थी वृत्ती दिसून येते. आपल्या मोबाइल मधील मेसेज संपतील याची पर्वा न करता तो आपल्याला मेसेज पुरवत असतो.
शाळेपासूनच संतोष मुंढे यांच्यासोबत खास दोस्ती. एकेकाळी जशी महाराष्ट्राच्या राजकारणात जोशी-मुंढे जोडी गाजत होती, तशी आमच्या वर्गातली ही कलव-मुंढे जोडी. मित्रांसोबत पिकनिक किंवा गेट-टूगेदरसाठी सर्वात प्रथम हात वर करणारा मित्र म्हणजे संजय. इथे हात वर करणे म्हणजे हात झटकणे असा अर्थ घेऊ नये. त्याने पिकनिकसाठी एक बॅग नेहमी तयारच ठेवलेली असते. संजयची एक खासियत म्हणजे तो तुम्हाला ऑनलाईन मिटिंगमध्ये सहसा दिसणार नाही.
आम्ही अजूनही अभ्युदयनगरमध्ये राहत असल्याने अधूनमधून आमची भेट होते. अगदी शाळेच्या मैदानात भेटायचं असेल तरीही संजय एकदम टापटीपमध्ये येणारं. मित्रा आयुष्यभर असाच टापटीप आणि टकाटक रहा हीच सदिच्छा ! 👍
समीर4 years ago
प्रसाद4 years ago
विकास सी.4 years ago
संजय के.4 years ago
विनायक4 years ago
सुनील4 years ago
दयानंद4 years ago
गीता4 years ago
संतोष एम.4 years ago
अनिल4 years ago
नरेश4 years ago
प्रशांत4 years ago
प्रकाश4 years ago
अवधूत4 years ago
विलास के.4 years ago
दिगंबर4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा