२८ नोव्हेंबर २०२५

'अंधार चाळ' ते 'ईका इलिटास'

संदर्भ: आमचे शाळूसोबती संजय यांच्या पुण्यातील नवीन घराचा वास्तूशांती कार्यक्रम
❤️ एक स्वप्नवत प्रवास पूर्ण केलास मित्रा! मनापासून अभिनंदन.

संजय, तुमचं ४ बीएचके चं प्रशस्त नवीन घर म्हणजे फक्त रेती, दगड आणि सिमेंटचं बांधकाम नाही, तर ते तुझं स्वप्न, तुझी मेहनत, तुझे नियोजन आणि कुटूंबियांची साथ याचं साकार रूप आहे. (कुटुंब आणि नियोजन शब्द जवळजवळ असले तरी इथे ते जोडू नका 😊) प्रेरणादायी असाच तुझा हा प्रवास आहे! लाल सलाम तुझ्या उंच भरारीला.

वास्तुशांती सोबत मातृ-पितृ पूजनाचा सोहळादेखिल केलास. मम्मीडॅडींच्या काळात असे समारंभ विरळाचं !

कृतज्ञता व्यक्त करताना ताईंनी तुमच्या बालपणीची हृदयस्पर्शी आठवण सांगितली. खरचं, अंधारचाळीत दिवसा-उजेडी अंधाराचे साम्राज्य असे. (याचा अनुभव मी शाळेत असताना एकदा शिव्या खाऊन घेतलायं 😃 ) आणि आज ईका इलिटासच्या १७ व्या मजल्यावरील तुझ्या घरी जेव्हा आम्ही पोहचलो तेव्हा पाहिले संधिप्रकाशाच्या सुवर्णकिरणांनी तुझ घर उजळून निघाले होतं. 👍

तुझ्या घराच्या ऐसपैस बाल्कनीतून दिसणारं ते हाय-वे चं विहंगम दृश्य. जणू खेळण्यातील गाड्या उतारावरून घरंगळत जातायतं अस वाटतं. दुर्दैवाने 😉 आपण दोघही 'अंगूर कि बेटी' च्या प्रेमात नाही, अन्यथा पावसाळी वातावरणात गझल ऐकत बाल्कनीत बसून स्वर्गीय आनंद घेता आला असता. असो ! तरीही आपण अमृततुल्य ☕ चहाचा घुटका आणि गरमागरम कांदाभजीवर समाधान मानू शकतो.

नविन घरात सुख, शांती समृद्धी लाभू दे. (आणि मोबाईलचं नेटवर्क घराच्या कोपऱ्या न् कोपऱ्यात येऊ दे ) हीच शुभेच्छा!!!💐

तळटीप: संजय, मला तुझा अभिमान वाटतो. तुझं नवीन घर म्हणजे आम्हा मित्रांसाठी पुण्यातील हा 'अधिकृत थांबा'! (अस लिहण्याच कारण पुण्यात कधी यायचं झाल तर हक्काने तुझ्या घरी येऊ शकतो 😊)
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

माझे शाळासोबती

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

Read more in this section:
वर्गशिक्षक: दहावी-अपी.टी. चा तासआठवणीतील बोंबाबोंब५० मार्कांचं संस्कृतगुगलचे मीठ अळणी७ वा वर्धापनदिनबॉईज ओन्ली - चर्चासत्रप्रसादचे पेनबंधमधली सुट्टीसुगंधी उटणंश्रावणातील स्नेहसंमेलनकन्याशाळेची भिंतस्नेहसंमेलन २०२१@ मुलुंड पोलीस स्टेशनमुलुंड ते काळाचौकीएक मुलाखत - गटप्रमुखांचीसुगंधी उटणं - एक प्रवासपन्नाशी पारची ऊर्जावृंदावन सोहळाअंधार चाळ ते ईका इलिटासअभिषेक लॉन -झूईंग ४२०
Close Video ❌
Share