१४ मार्च २०२१

एक होता कोविड योद्धा...

जेव्हापासून मोबाइलवर कोविड लस प्राप्त करण्याचा दिवस व वेळ नमूद केलेला मेसेज आला, तेव्हापासून मनात एक अनामिक हुरहुर होती. जणूकाही अमृतप्राप्ती होवून अमरत्व मिळणार आहे असा भास होत होता.

आज तो सुदिन उगवला ज्या दिनी मला कोविड लस प्राप्त होणार होती. पुराणकाळात घोर तपश्चर्या करून वीर योद्धे देवांकडून दिव्यास्त्र प्राप्त करीत तशीच काहीशी भावना मनात होती. आज जवळपास वर्षभराच्या खडतर परिश्रमांनंतर शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले कोविडास्र मला प्राप्त होणार होतं.

भ्रमणध्वनीवरुन इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहन आरक्षित केले. वाहनप्रवासात मन:चक्षू समोरून गेल्या काही महिन्यातील जीवनप्रवास सरकून गेला. कोरोनासोबत झालेली छोटीशी चकमक. त्यातून सहिसलामत बचावणे. आयुष्यातील त्या कठिणसमयी शुभचिंतकांच्या शुभेच्छा खूपच कामी आल्या. कोरोनामुळे दैनंदिन जीवनात आलेले निर्बंध. वातावरणातील नैराश्य, भविष्याबाबत अनिश्चतता. समस्त परिस्थितीचा विचार करता कोविडास्त्र भात्यात असणे आवश्यक बनले होते. विचारांच्या तंद्रीतच ठिकाणापाशी पोहचलो.

लसीकरण दालनात बरिच गर्दी होती. माझ्यासारखे बरेच योद्धे कोविडास्र प्राप्तीसाठी आले होते . परिचारीका तर परीच भासली मला. आवश्यक ते सोपस्कार पार पाडून कोविडास्त्र प्राप्त केले. एक वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता. अतिआत्मविश्वास म्हणालात तरी चालेल. हवेत तरंगतच मी लसीकरण दालनातून बाहेर आलो. आनंदाच्या भरात मी ललकारी दिली,

"आता ये करोना. ये मी तुझी वाट बघतोयं"


त्याचक्षणी चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा झाला आणि जाग आली. समोर बायको उभी होती, नजरेत अंगार भरला होता. 😡

"तुमची एवढी हिम्मत! कोण ही करुणा?"

चाणाक्ष वाचकांनी ओळखलेचं असेल उत्साहाच्या भरात करोनाचा उच्चार चुकला होता. आता बायकोच्या हल्ला परतवण्यासाठी कोणतीच लस कामी येणार नव्हती. आता एक महिनाभर होम क्वारंटाइन. भोगा आपल्या कर्माची फळं! 😂

आता सुरक्षितता म्हणून कोविड योद्धा झोपेतसुद्धा मास्क लावून असतो.
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

कोरोना काळ

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

रविदत्त4 years ago

लसीकरणाच्या बातम्या पाहून वाचून झालेला परीणाम 😃🤣
पण करोना ला करूणा म्हणून हाक मारणारा संतोष ऐकमेव अद्वितीया😜

विनायक4 years ago

संतोष, simply great.

सुनील4 years ago

🙂 मस्तच...सदमा😂

दयानंद4 years ago

लै भारी....👌🏻👌🏻👌🏻

संजय डी.4 years ago

काल रातीला सपान पडलं
सपनात आलं तुम्ही
नी बाई मी गडबडले 😬😜

प्रसाद4 years ago

😂😂😂👌🏼👌🏼👌🏼 गोष्टीचा करूणामय शेवट 😅

प्रदीप4 years ago

'करुणा'करा धन्य आहेस🙏👌

वैशाली4 years ago

काय वर्णन 😄👌🏻

संजय के.4 years ago

👌👌 झोपेतला मास्क वेगळा असतो 😉

अवधूत4 years ago

अफलातून 😃😃😃💉💪🏻

महेश4 years ago

🤣🤣

संतोष एम.4 years ago

👌🏻😄😄

नीना4 years ago

😄😄👌

समीर4 years ago

🤣🤣👌🏻👌🏻

नेत्रा4 years ago

🤣🤣

निकेता4 years ago

😃😃👌

वर्षा डब्ल्यू.4 years ago

😆

गीता4 years ago

🤣🤣🤣🤣

विलास पी.4 years ago

👌🏼👌🏼👌🏼😁

विकास सी.4 years ago

😀😀😀👌👌👌

प्रशांत4 years ago

👌👌👌👌👌

राजश्री4 years ago

👌

दिगंबर4 years ago

👌🏻👍🏻

दिलीप4 years ago

👌👌😄😄

अनिल4 years ago

😂😂

अभिजित4 years ago

😂😂😂

प्रकाश4 years ago

🤣🤣👌🏻👌🏻

नरेश4 years ago

👌👌

गणेश4 years ago

👌🙂
Read more in this section:
माझा भारतबंदितील जीवनयुद्ध कोरोनाचसोशल डिस्टन्सिंग - सोसल काय?भेटि लागी जीवाएक होता कोविड योद्धासंतूवाणी आला परतुनीपास झाला! किती टक्केना-हरकत प्रमाणपत्रपिकनिक फ्रॉम होममास्कसम्राट
Share