कोरोनासोबतच्या ह्या लढाईत आज आपण सारेच अर्जून आहोत. पण ह्या कलियुगात अर्जूनाला गीता सांगायला प्रभू श्रीकृष्ण येणार नाहीत. द्रोणांचा चक्रव्यूह तर अर्जूनाने भेदला असता, पण कोरोनाचा दृष्टिस न पडणारा चक्रव्यूह कसा भेदावा?
आज पार्थाला स्वानुभवावरच कोरोनाला पराभूत करायचं आहे. पार्थ कोरोनाच नि:पात करण्याच्या उद्देशाने बाजाराच्या कुरूक्षेत्रावर पोहचला. जमावबंदी असल्याने बाकिचे अनुज महालातच थांबले होते. बाजारात एक दृष्टिक्षेप टाकताच त्याला दिसले, त्याच्या आजूबाजूच्या प्लॅटमध्ये रहाणारे राजे, महाराजे मुखवस्त्र बांधून बाजारात फिरत होते. पार्थ संभ्रमात पडला. हा कोरोना नावाचा मायावी राक्षस शोधावा तरी कसा? माधवाला पाचारण करावे का? लॉकडाऊन मध्ये रथ चालवायला परवानगी मिळेल का? कुरूक्षेत्रावर निदान आप्तस्वकियांशी लढायच आहे हे तरी माहित होते, पण ईथे विरूद्ध बाजूला कोणीच दिसत नाहीय.
सगळी धनुर्विद्याच पणाला लागली होती. गुरूवर्य द्रोणाचार्यांचे स्मरण करून पार्थाने धनुष्याला बाण लावला आणि डोळे मिटून सारा सिलॅबस आठवू लागला. अशी मनोवस्था महाभारत युद्धात सुद्धा आली नसेल. कोरोना नावाच्या राक्षसाकडून हल्ल्याचा कोणताच प्रयत्न झाला नव्हता. डोळे ऊघडून पार्थाने सभोवार पाहिले. परिस्थितीत काहिच बदल नव्हता. ना कोणी पळताना दिसत होते, ना कोणी धारातीर्थी पडताना!
विमनस्क अवस्थेत पार्थाने बाण पुनश्च भात्यात ठेवला. खिन्न मनाने त्याची पाऊले माघारी वळली. महालापाशी कधी पोहचला त्यालाच कळल नाही. महालात प्रवेश केला तोच आकाशवाणी झाली. "हे पार्थ धनुष्यबाण सॅनिटाईज करून ठेव आणि शुचिर्भूत हो. सारी युद्ध धनुष्यबाणाने जिंकता येत नाहीत"...
"अहो किती वेळ लोळत पडणार आहात. बेसिनमध्ये भांड्यांचा ढिग पडलाय तो धुवून काढा आधी."
अरेच्चा ! स्वप्न होते तर.. संतूवाणी खिन्न मनाने बेसिनच्या दिशेने चालू लागला. 😂
वर्षा एस.5 years ago
संजय डी.5 years ago
प्रशांत5 years ago
संजय के.5 years ago
नीना5 years ago
विनायक5 years ago
राजश्री5 years ago
दीपक5 years ago
प्रदीप5 years ago
सुनील5 years ago
समीर5 years ago
विनय5 years ago
गीता5 years ago
अवधूत5 years ago
गणेश5 years ago
दयानंद5 years ago
नेत्रा5 years ago
विकास सी.5 years ago
प्रसाद5 years ago
विलास के.5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा