एखाद्या कौटुंबिक समारंभात कोणीतरी काका / मावशी समोर येतात आणि विचारतात "काय रे ओळखलंस काय मला ?" आपल्याला त्यांचा चेहरा ओळखीचा भासतो, पण नाव आठवत नसतं. त्यांना वाईट वाटू नये म्हणून आपण बिनदिक्कत "हो" म्हणतो. आपल्या डोळ्यातले भाव ओळखून त्यांनी जर विचारलं "नाव सांग बघू माझं". तर मग त्यांचं नाव काहीही असो, आपला पोपट ठरलेला. अशा तऱ्हेने खूपदा पोपट झाल्याने हल्ली मी सावध पवित्रा घेऊन स्पष्ट सांगतो, "चेहरा ओळखीचा वाटतोय नाव आठवत नाहीयं" 😊
दूरचे नातेवाईक क्वचितच भेटतात पण ओळख म्हणून त्यांची नावं लक्षात ठेवावी लागतात, किमानपक्षी त्यांच कोणाशी काय नातं आहे ते तरी लक्षात ठेवावं लागतं. हा अमकिच्या नणंदेच्या सुनेचा मावसभाऊ, हा थोरल्या जाऊंच्या भावाचा साडू. अरे यार! इथे मुळात नणंद, जाऊ , साडू हेच समजून घेतानाच आमची मारामार. पण स्त्रियांना या बाबतीत मानलं पाहिजे. जबरदस्त मेमरी! नाती तर लक्षात ठेवतातचं आणि वर एखादिने गेल्या फंक्शनला कांजीवरम नेसली होतो कि पैठणी ते पण लक्षात ठेवतात. (मला साड्यांचे हे दोनच प्रकार माहित आहेत 😃)
रोजच्या व्यवहारात तोंडओळखही पुरेशी असते. रोजचा दुकानदार, भाजीवाली, पान-टपरीवाला यांची नावं बऱ्याचदा आपल्याला माहित नसतात, पण आपण त्यांना आणि ते आपल्याला ओळखत असतात. कधी कधी ओळख एकतर्फी असते. जसं कि मी सचिन तेंडुलकरला चांगलं ओळखतो पण तो मला ओळखत नाही. असो! 😃 माणसं ओळखणे, लोकांच्या ओळखी करून घेणे हि एक कला आहे. तसेच समाजात एक चांगला माणूस म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणे हे प्रशंसनीय कार्य आहे.
प्रसाद3 years ago
नीना3 years ago
रविदत्त3 years ago
गीता3 years ago
गणेश3 years ago
नेत्रा3 years ago
अवधूत3 years ago
विजय3 years ago
विलास के3 years ago
विनायक3 years ago
वर्षा डब्लू.3 years ago
समीर3 years ago
मनीषा बी.3 years ago
संतोष एम.3 years ago
शैका3 years ago
संजय के.3 years ago
संजय डी.3 years ago
दयानंद3 years ago
दिगंबर3 years ago
राजश्री3 years ago
मनीषा3 years ago
सुनील3 years ago
प्रदीप3 years ago
कीर्ती3 years ago
अनिता3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा