Hemant Kadam

🍎 Apple-प्रेमी हेमंत

माझा ऑफिस-सहकारी मित्र हेमंत यास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 💐

हेमंतचं इंग्रजीतल्या सफरचंदावर खूप प्रेम आहे. म्हणजे तुम्ही अगदी असं म्हणू शकता He is die-hard fan of Apple Products.

Apple हे राष्ट्रीय फळ घोषित करावे म्हणून लोअर-परेल ईथे लाक्षणिक उपोषण करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला , परंतु सरकारने 🔔 लक्ष न दिल्याने त्याला Apple Juice पिऊन उपोषण सोडावे लागले.

Appleचा एवढा चाहता आहे की अगदी 🍑 हापूस आंबा खायचा असेल तर आधी आंब्यावर पेन्सिलने Apple लिहतो व मग आंबा खातो. 😍

Most Eligible Bachelor, म्हणजे बघा ज्याच्या LinkedIn Profileवर Dating Request येतात... पण जोपर्यंत कुरळ्या केसांची राजकन्या सापडणार नाही तोपर्यंत विवाह करणार नाही, मग अगदी डोक्यावरचा उरलेला केशसंभार गेला तरी चालेल !😍

ॲमस्टरडॅम शहराबद्दल विशेष प्रेम. पण तिथलं आधार कार्ड नसल्याने मग आपलं ॲम्बरनाथ बरं! असं म्हणून आहे त्यात आनंद मानणारा. 😊

टापटीप राहण्याचे म्हणालं तर यांच्या स्कूटरच्या कव्हरची घडीसुद्धा 📏मोजपट्टीने मोजण्याएवढी काटेकोर 👌असते. चुकून जर यांच्या 💻 MaC च्या स्क्रीनला आपला हात लागला तर डेटॉलने आंघोळ घालतात.. MaC ला! 😊

वर लिहलेल्या काही गोष्टींमध्ये अतिशोयक्ती असू शकते. परंतु हेमंतबाबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकालच्या जगात सापडायला दुर्मिळ असा निर्मळ, स्पष्टवक्ता स्वभाव. अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा असा मित्र. मित्रांना मदत करण्यास नेहमीच तयार असणारा कर्तव्यदक्ष मराठा!

हेमंत पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूपखूप सफरचंदी शुभेच्छा !!!💐🍎

४ नोव्हेंबर २०१८
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

शुभेच्छा पत्रं

तुमची प्रतिक्रिया लिहा

✍️ तुमची प्रतिक्रिया लिहा

Read more in this section:
नरेशसुनीलविनयदिगंबरअभिजितप्रशांतरविदत्तविलास पी.अभयविलास के.समीरहेमंतसंजय केमहेशविनायकप्रसादनीनास्वप्नाअनिलअजितविजयप्रदीपसायमनप्रकाशविकास सी.गीतासंजय डीसंतोष एमगणेशविवेकानंदअदृश्यअनितावर्षाराजश्रीवसंत
Close Video ❌
Share