आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मंडळ आभारी आहे आणि मी खूप भारी आहे. 😍
मला वाटलं होतं कोणीतरी पानभर लेख लिहिलं माझ्यावर. नाही म्हणायला काही मित्रांनी प्रेमाखातर चार-दोन ओळी लिहिल्या. परंतु माझ्या प्रतिभावान, उत्तुंग, चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला न्याय द्यायचा असेल तर किमान हजार पानांची कादंबरी लिहावी लागेल. (कोणी लिहिणार असेल तर कागद पुरविले जातील...स्वस्त दरात 😁)
नंतर आठवलं, अरेच्च्या ! ग्रुपवरचा प्रथितयश लेखक तर मीच आहे. पण मी स्वत:वर लिहणं म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखं होईल. चार-सहा इंचाच्या मोबाइल स्क्रीनवर माझ्यासारख्या भाषाप्रभूला बंदिस्त करणं म्हणजे अवाढव्य सुमो पहिलवानाला नॅनोमध्ये कोंबण्यासारखं होईल. आता मीच माझी स्तुती करणे म्हणजे घोड्याने गाढवाला शाबासकी दिल्यासारखं वाटेलं. (प्राणी गडबड वाटतायंत? मग तुमच्या हिशोबाने दुसरे प्राणी घ्या 😉) थोडक्यात काय तर अहं ब्रम्हास्मि !
च्यामारी मीपणाची हद्द झाली. संतूवाण्याचा वाढदिवस आहे, म्हणताना भंकस जरा जास्तच झाली. ते वर लिहलेलं घोडा, गाढव, सूर्य, आरसा... वगैरे विसरून जा. आता माझ्या खऱ्या पातळीवर येतो. मी किती बरं-वाईटं लिहितो माहित नाही. ते ठरवायचं काम वाचकांचं आहे. तुम्हां सर्वांकडून प्रोत्साहन मिळतं म्हणून लिहितो. (हे फक्त बोलण्यापुरतं!) तुम्ही शाब्बासकी नाही दिलीत तरी मी लिहिणारचं 😘
मला इथे आवर्जून सांगावस वाटतं मी लिखाण सुरु ठेवण्यात संजय डी. आणि विलास पी. (राजकीय विचारसरणीतील माझे एक नंबरचे विरोधक) ह्या दोन मित्रांचा मोठा वाटा आहे. म्हणजे काय दोष द्यायचा आहे तो त्यांना द्या.
बाकी मित्रांनो मला सन्मानपत्राची आवश्यकता नाही तुमचं एक 👍Like ही पुरेसं आहे.
अभय4 years ago
नीना4 years ago
संजय डी.4 years ago
दिलीप4 years ago
वर्षा डब्ल्यू.4 years ago
अवधूत4 years ago
विनायक4 years ago
वसंत4 years ago
प्रदीप4 years ago
अनिल4 years ago
अभिजित4 years ago
दिगंबर4 years ago
नरेश4 years ago
समीर4 years ago
विकास सी.4 years ago
महेश4 years ago
संजय के.4 years ago
संतोष एम.4 years ago
प्रसाद4 years ago
प्रशांत4 years ago
वैशाली4 years ago
राजश्री4 years ago
गणेश4 years ago
विलास के.4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा