बराचं वेळ वाट बघितली.(उगाचचं!) हवेतून उडत कोणाचा मेसेज येतो का! म्हणजे अपेक्षित नव्हतं पण म्हंटल, अनपेक्षित लक्कि ड्रॉ किंवा चुकून कोणी पाठवला तर... आता काय येईल अस वाटतं नाही. मी मनाला समजावलं, निराश होऊ नकोस, व्यक्त हो! बघ तुझ्यासारखे बरेच समदुःखी भेटतील
अहो, कसला मेसेज म्हणजे? 'व्हॅलेंटाइन डे' चा. ज्या अनेक परदेशी परंपरा भारतात रूळल्यायतं त्यातली ही एक. फेब्रुवारीच्या ७ तारखेपासूनच तरूणाईला प्रेमाची चाहूल लागायला सुरूवात होते. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे...असे दिवस क्रमाक्रमाने साजरे करत १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे. अशी प्रेमाची इतिश्री. काहीजणांचे प्रयत्न सार्थकी लागतात. उरलेले रिपीटर पुढच्या वर्षीसाठी तयार. काही अतिउत्साही प्रेमवीर तर एकाच वेळी दोन-चार 'व्हॅलेंटाइन स्पर्धापरिक्षांचे' फॉर्म भरतात.
तरूणांच्या ऊत्साहात आपण अगदीच कालबाह्य होऊ नये म्हणून आजकाल मध्यमवयीन गृहस्थाश्रमी देखिल यात हिरीरीने भाग घेतात. विवाहितांनी जी कायमस्वरूपी व्हॅलेंटाइन लाभली आहे त्यातच आनंद साजरा करावा. अगदीच काही नाही तर,
"व्हॅलेंटाईन म्हणजे केवळ प्रियकर-प्रेयसीच प्रेम नसतं... तर भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिण, आई-बाबा, काका-मामा, प्राणी-पक्षी कोणावरही प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे"...
असे सांत्वनपर मेसेजसुद्धा सोशल मिडियावर फिरत असतात. पण त्यात काही तथ्य नाही हे आपल्याला माहीत असतं. 😊
आमच्या तारूण्यात हे आतासारखं रोझ, प्रपोज, व्हॅलेंटाइन्स् अस डेज् च भरघोसं पीक येत नव्हतं. जरी असतं तरी आमच्या नशीबाला काही खूप लाल गुलाब लागले असते असही नाही. बस्स! फक्त मनाच्या समाधानासाठी हळहळं व्यक्त करायची. 😂
टिप: आपल्यावर कोणी प्रेम करो वा ना करो. आपण इतरांवर प्रेम करत रहायचं. खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे. 🙏रविदत्त5 years ago
राजश्री5 years ago
प्रसाद5 years ago
संजय डी.5 years ago
नीना5 years ago
प्रदीप5 years ago
अवधूत5 years ago
संतोष एम.5 years ago
गणेश5 years ago
अनिल5 years ago
विलास के.5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा