इयत्ता चौथीत असताना शाळेच्या नाटकात प्रकाशने मवाल्याची भूमिका इतकी बेमालूम वठवली होती की त्यानंतर म्हणजे अगदी दहावी होईपर्यंत प्रकाश हा खरोखरचं मवाली मुलगा आहे अशीच माझी समजूत होती. क्षमस्व प्रकाश ! पण आता मी ज्या प्रकाशला ओळखतो तो बराच वेगळा आहे. अधूनमधून प्रकाश आणि प्रसादमास्तर हे मला मराठी व्याकरणाची शिकवणी देतात. प्रकाशचं मराठी भाषेचं ज्ञान आणि शब्दसंपत्ती चकित करणारी आहे. तुम्हाला कदाचित त्याचा अनुभव नसेल, कारण माझ्यासारखं लेखनप्रतिभेचं प्रदर्शन करण त्याला आवडत नसावं किंवा वेळेअभावी शक्य होत नसावं किंवा बालपणापासून एका महागुरुंच्या सान्निध्यात असल्याकारणे शिष्योत्तम पक्या मध्ये ही विरक्ती आली असावी 😉 असो ! प्रत्येकाचा स्वभाव वेगळा.
प्रकाशची शालेय जीवनातील एक धमाकेदार आठवण आहे. एकदा वर्गात भूमितीच्या तासाला शिर्केसर प्रमेय शिकवत होते. सारा वर्ग शांतचित्ताने ऐकत होता आणि अचानक पक्याभाईंनी भर वर्गात फटाक्यांमधली टिकली वाजवली होती. केवढं हे धाडस! ते अनवधानानं झालं, असं प्रकाशच म्हणणं आहे. पण त्यानंतर सरांनी आतषबाजी करून त्याच्याबरोबर व्यवस्थित दिवाळी साजरी केली होती...और प्रकाशबाबू एक टिकली कि किमत जान गये. 🤦
प्रकाश भारतीय रेल्वमध्ये मोटरमन ह्या पदावर कार्यरत आहे. (तुम्हाला कधी रेल्वे चालवावीशी वाटली तर संपर्क साधा 😀) दररोज रेल्वे-रुळांसारखं सरळमार्गाने काय चालायचं? म्हणूनच कदाचित गिरिभ्रमणाची आवड जोपासलीयं त्याने. हिमालयातील पर्वत रांगा आणि महाराष्ट्रातील दुर्गांवर त्याचे विशेष प्रेम. जवळपास पंचवीस-तीस किल्ले तर त्याने सहज काबीज केले असतील. नुसतीच भ्रमंती न करता, त्यांच्या गिरिभ्रमण ग्रुपसोबत समाजसेवतदेखील सहभागी असतो. प्रकाश, आयुष्यात यशशिखरांवर विराजमान हो ! ह्याच शुभेच्छा. 👍
महेश3 years ago
सुनील3 years ago
संजय के3 years ago
विनायक3 years ago
शैका3 years ago
रविदत्त3 years ago
दयानंद3 years ago
प्रशांत3 years ago
प्रसाद3 years ago
गणेश3 years ago
संतोष एम.3 years ago
प्रदीप3 years ago
अवधूत3 years ago
वर्षा डब्लू 3 years ago
राजश्री3 years ago
समीर3 years ago
अभिजीत 3 years ago
विलास के3 years ago
नरेश 3 years ago
अनिल3 years ago
प्रकाश 3 years ago
अभय 3 years ago
दिगंबर3 years ago
संजय डी 3 years ago
शैलेश के3 years ago
वसंत3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा