०९ ऑगष्ट २०२२

मास्कसम्राट !!! 😷

हल्ली लोकल ट्रेनमध्ये कोरोनाला कुणीचं भाव देत नाही. रोज मास्कधारकांची संख्या कमी होतेय. संपूर्ण डब्यात माझ्यासारखा एखाददुसरा मास्कधारक असतो बाकी सगळे कोरोनाला प्लॅटफॉर्मवर मारून आलेले असतात. 😀 आणि आज तो सुदिन उगवला जेव्हा संपूर्ण डब्यात मी एकटाच मास्कधारक होतो. हो, मीच तो मास्कसम्राट !

To be Or not to be. That is the question.
मास्क लावावा कि लावू नये
हा एकच सवाल आहे
या रेल्वेच्या डब्यात घामेजलेल्या गर्दीचा भाग होऊन, गाठावं ऑफिस लाचार आनंदानं
की फेकून द्यावं मास्कच फडकं
त्यात गुंडाळलेल्या किटाणूंसह
रेल्वेच्या समांतर रुळांमध्ये?
आणि करावा कोरोनाच्या भीतीचा शेवट
एकाच बुस्टर डोसने
माझा तुझा याचा आणि त्याचाही.
वॅक्सीनच्या सुईने
कोरोनाला असा डंख मारावा
की त्याच्या किटाणुना
नसावा जागृतीचा किनारा कधीही
पण त्या किटाणुनी 👹
पुन्हा रूप बदललं तर
तर-तर
इथचं मेख आहे.
नव्या किटाणुचे अनोळखी हल्ले
सहन करण्याचा धीर होत नाही
म्हणून आम्ही सहन करतोय
हि मुस्कटदाबी मास्कची.
सहन करतोय विनामास्क प्रवाशांच्या
कुत्सित नजरा. उभा राहतो खालमानेने
दरवाजाच्या कडेला प्लॅटफॉर्म आणि पायदानातील अंतर मोजत😝
विधात्या, तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला, आम्ही ज्यांना जन्म दिला ते मास्क लावत नाहीत
आणि दुसऱ्या बाजूला, ज्यांनी आम्हाला जन्म दिला तेपण मास्क लावत नाहीत 🤦‍♂️
मग चुरगळलेल्या मास्कचे हे फडके घेऊन
हे करुणाकरा,
आम्ही येड्यांनी
कोणतं सॅनिटायझर वापरायचं
कोणतं - कोणतं 🫣 🍺🍷🥃🍾
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

कोरोना काळ

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

उदय3 years ago

😀 मस्त 👌👌👌👌

अभिजीत3 years ago

👌👌 सही एकदम माझ्या मनातले बोललास... कारण कंपनीत आणि घरात पण मी... Last man standing with mask😁😁😁😁😁 इतके टोमणे ऐकतोय . मास्क वरून.. सगळ्यांना हा लेख पाठवतो😁😁😁👍👍👍👍

रोहित3 years ago

👌🏻👍

मनीषा3 years ago

छान मांडली आहे मनोव्यथा ...to be or not to be .... मस्त 👌🏻👍😊

भाग्यश्री3 years ago

आता एवढाच पर्याय उपलब्ध आहे सर घ्यायला हरकत नाही 🤭😃😃

अनिता3 years ago

👌🏻👌🏻😄😄👏👏मास्कसम्राट 🍫🍫💐

सुमित3 years ago

😀😀 .. dark comedy. Well written

जगदीश3 years ago

👌👌👍

अमित डी3 years ago

Chan

वर्षा3 years ago

मस्त👌 मास्क लावू नये 😄

अनिल जी3 years ago

१ नंबर👌👌👍👍

अमित3 years ago

👍🏻👍🏻🍻

नेत्रा3 years ago

भन्नाट काळाचौकीकर शेक्सपियर शिरवाडकर 🙏👌

राजश्री3 years ago

😀😀

संदीप3 years ago

😀👍

सुशांत3 years ago

👌🏻👌

वंदू3 years ago

👌🏻👌🏻😄😄

प्रतिमा3 years ago

👌👌मस्त

अजित3 years ago

👌👌 Jabardast 👌👌

प्रभा3 years ago

👌👌👌

जतिन3 years ago

👌🏻👌🏻👌🏻सुपर से उपर

विजय3 years ago

👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻Too Good Santosh Sir.....

संदेश3 years ago

👌

प्रकाश3 years ago

विमनस्क मास्कसम्राट.... वाहव्वा....मजा आली...😁😁👌🏻👌🏻

महेंद्र3 years ago

👌🏻🤔🙏

संतोष एम3 years ago

👌🏻👌🏻👌

प्रसाद3 years ago

😄👌👌👌

दिगंबर3 years ago

👌🏻😀

समीर3 years ago

😂👌👍🏽मस्तवाणी,एकदम मनातल‌🙏

विलास के3 years ago

सम्राट 👍

अनिल3 years ago

👌👌👌🤦‍♂️🤦‍♂️

विजय3 years ago

हा मास्क सम्राट कधी कधी असतो माझा बरोबर ट्रेन मध्ये कॉटन ग्रीन ते माहिम

प्रशांत3 years ago

👍👍👌👌

सुनील3 years ago

मस्त 👌🏽👌🏽👌

विलास पी3 years ago

😂 मास्क म्हणजे outgoing कमी होत, incoming ला जास्त फरक पडत नाही. खरतर तुझ्या मास्क लावण्याने तू दुसऱ्यांची काळजी घेत असतोस, तुला त्याचा विशेष फायदा नाही.

प्रदीप3 years ago

मास्कसम्राट ...👌👌👍

नरेश3 years ago

👌👌

गणेश3 years ago

म(स्त)स्कच लिहिलं आहेस तू... 👌😀

संजय के3 years ago

मस्त 👌👌 फेकून दे मास्क रेल्वेच्या समांतर रुळामध्ये 😂

विकास3 years ago

वाह!!! जबरदस्त!!😁😁😁😁

नितीन3 years ago

👌

दयानंद3 years ago

👌👌👌

शैलेश के3 years ago

Wah kya baat hai 👌
Read more in this section:
माझा भारतबंदितील जीवनयुद्ध कोरोनाचसोशल डिस्टन्सिंग - सोसल काय?भेटि लागी जीवाएक होता कोविड योद्धासंतूवाणी आला परतुनीपास झाला! किती टक्केना-हरकत प्रमाणपत्रपिकनिक फ्रॉम होममास्कसम्राट
Share