
३१ डिसेंबर आणि राजेशचा वाढदिवस यास दुग्धशर्करा(?)😜 योग म्हणावे का? सध्या सोशल मीडियावर मनोरंजनाचे मुबलक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु आमच्या शालेय जीवनात जेव्हा मोबाईल आणि सोशल मीडियाचा मागमूसही नव्हता तेव्हा माधव आमच्या मनोरंजनाचा हुकमी एक्का होता.
वर्गात ऑफ तासाला 'मालवणी वस्त्रहरण' एकपात्री करणारा अवली कलाकार. डॉक्टर काशिनाथ घाणेकरांची आठवण करून देणारी चेहरेपट्टी. दहावीतील बोंबाबोंब प्रकरणातील मुख्य कलाकार. शाळेत मागील बाकावरील विद्यार्थी असल्याने अनेक उपद्व्यापात सहभाग. अशैक्षणिक उपक्रमांमध्ये मित्रांना मार्गदर्शन करणारा गुरू. लालबाग-मार्केट गल्लीमध्ये बबलू नावाने प्रसिद्ध.
सध्याच्या मोबाईल युगातही माधवाचा ऑनलाईन वावर कमीच असतो, पण ऑफलाईन भेटीगाठींना उपस्थित असतो. मध्यंतरी तब्येतीची हेळसांड केल्यामुळे रूग्णालयाची वारी करून आलायं. सुदैवाने आता प्रकृती सुधारते आहे. म्हणजे पुढच्या पिकनिकला माधवाचा नृत्याविष्कार पाहता येईल. 👍
तळटीप: तात्या सरपंचांनु तब्येतीची काळजी घेवा. समस्त गावकरी तुमच्या वस्त्रहरणाची वाट बघतहत. 😃वसंत2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा