हो ! तुम्ही बरोबर वाचलयंत. कोणे एके काळी माझ्या व्यायामाची शाळाचं झाली. कारण माझे व्यायामशाळेत प्रवेश घेण्याचे निमित्तचं तसे होते - मैने प्यार किया मधला प्रेम म्हणजे, सलमान.
माझ्या वयाच्या बहुतेकांनी बघितलाचं असेल हा सिनेमा आणि सिनेमा आवडण्याचे प्रत्येकाचं वेगवेगळं कारणही असेल. त्या सिनेमात सलमान एकदम सुकुमार दिसत होता. एक-दोन सीनमध्ये सलमान व्यायाम करताना दाखवलायं. तेव्हा लयं भारी वाटला होता. तसही कॉलेजात असताना काय आवडावं, काय आवडू नये ह्याला लॉजिक नसतं. सुमन म्हणजे आपली भाग्यश्रीपण कसली सुंदर दिसली होती!
कॉलेजच्या गुलाबी(?) दिवसांत असे चित्रपट बघितले की 'आपल्यालाही गर्लफ्रेंड असावी बुवा' अस वाटतं काहीजणांना (बऱ्याचजणांना). ते कंपलसरी नसतयं पण आपलं वाटतं! 😍
कॉलेजात जाऊन दोन वर्ष झाली तरी गर्लफ्रेंडचा पत्त्ता नव्हता. काही मित्रांना मुलींशी मैत्री करायची कला अवगत असते. पण आमची गत अशी होती कि बसमध्ये पुढे मुलगी असेल आणि आपल्याला स्टॉपवर उतरायचे असेल तर तिला 'एक्सक्युज मी' म्हणणं पण जीवावर यायचं. म्हणजे 'आय लव्ह यु' म्हणेपर्यंत जीवचं जायचा 😀 (आमच्या शाळेत चौथीनंतर मुलामुलींचे सहशिक्षण नव्हते, त्यामुळे हा न्यूनगंड वा अहंभाव निर्माण झाला असेल का? संशोधनाचा विषय होऊ शकतो)
माझा असा एक गैरसमज होता, कॉलेजमध्ये मुलींना इंप्रेस करायचे असेल तर आपण खूप स्कॉलर असायला हवे किंवा आपली पर्सनॅलिटी डॅशिंग हवी. आमची दोन्हीकडे बोंब! बुद्धी सुमार आणि यष्टिसारखी शरीरयष्टी. बुद्धीचं काही करता येण्यासारख नव्हतं, म्हणून कदाचित स्कॉलर होण्यापेक्षा बॉडीबिल्डर 💪 होण सोप्पं वाटलं तेव्हा.
तर बिल्डिंगमधल्या मित्रांसोबत 'मैने प्यार किया' बघून आलो आणि ठरवलं व्यायामशाळेत जायचचं. त्याकाळी आमच्या एरीयात आत्तासारख जिमच पेव फुटल नव्हतं. सिक्स पॅक वगैरेचा फंडापण नव्हता, फक्त तब्येत कमावायची एवढीच अपेक्षा. सोबत अजून दोन मित्र होते. त्यातल्या एकाला व्यायामाची थोडिफार आवड होती, दुसरा मैत्रीखातर गंमत म्हणून तयार झाला. आम्ही तीन मित्रांनी जवळच्याच देवदत्त व्यायामशाळेत प्रवेश घेतला. पुढे काय झालं?... 🤔
उत्तरार्धात वाचाउदय3 years ago
संजय के.3 years ago
नेत्रा3 years ago
विनायक3 years ago
विलास के3 years ago
विलास पी.3 years ago
रविदत्त3 years ago
संध्या3 years ago
शैका3 years ago
अवधूत3 years ago
प्रसाद3 years ago
नरेश3 years ago
प्रकाश3 years ago
वर्ष एस.3 years ago
दिगंबर3 years ago
समीर3 years ago
राजश्री3 years ago
मनीषा3 years ago
दया3 years ago
सुरेश3 years ago
विजय3 years ago
सुनील3 years ago
मनीषा बी.3 years ago
नीना3 years ago
अभय3 years ago
प्रदीप3 years ago
प्रशांत3 years ago
महेश3 years ago
गीता3 years ago
गणेश3 years ago
भाग्यश्री3 years ago
अनिल3 years ago
किसन3 years ago
पल्लवी3 years ago
अजित3 years ago
जितू3 years ago
वंदना3 years ago
रोहित3 years ago
सुमित3 years ago
प्रथमेश3 years ago
चारू3 years ago
प्रणव3 years ago
संदीप3 years ago
अक्षता3 years ago
अमित3 years ago
विनायक एस3 years ago
प्रदीप जे.3 years ago
सायमन3 years ago
शशिकांत3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा