अनिता, हे कन्याशाळेतील अजून एक नाव जे मधली सुट्टीमुळे मला माहित झालं. कुठल्या वर्गात होती, कोणत्या कॉलेजला होती काहीच माहिती नाही. परंतु अनिता चांगली कॅरमखेळाडू आहे, हि सुखद धक्का देणारी माहिती. त्याकाळी 'स्पोर्ट्स' हे क्षेत्र मुली अभावानेच निवडताना दिसतं. (भातुकलीच्या खेळात मात्र मुलींची मास्टरी असे ) त्यामुळे अनिताला कॅरमची आवड कधी निर्माण झाली याविषयी संशोधन करावे लागेल. 🧐
कुठलाही खेळ खेळणं ही काही फारशी कठीण गोष्ट नाही. (आपल्या घरात तर आपणच कॅरम चॅम्पियन असतो) पण स्पर्धात्मक खेळात भाग घेऊन बक्षिसं मिळवणं हे कौतुकास्पद आहे. अनिता सध्या भारतीय डाक विभागात कार्यरत आहे. फोटोत टेबलावर दिसणाऱ्या ट्रॉफीज पोष्टाने मागविलेल्या नसून तिने मेहनतीने मिळवल्या आहेत.👍
आपल्या २५ डिसेंबर च्या गेट-टुगेदरमधील संगीतखुर्ची स्पर्धेतदेखील तिला बक्षीस मिळालं होतं. कदाचित स्पर्धा आणि बक्षीस यांच्यासोबत तिचं खास नातं असावं ! अनिता फक्त स्पर्धांमध्येच भाग घेते असं नाही, अधूनमधून ती डाक विभागाचं कार्यालयीन कामकाजदेखील बघते 😊. ग्रुपवरील तिचा वावर म्हणजे तिला कधी जाग आली की प्रेरणादायी विचारांच्या पोष्ट फॉरवर्ड करते. असो ! हे हि नसे थोडके.
अनिता, तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!! 💐🙏
रविदत्त2 years ago
शैका2 years ago
प्रकाश2 years ago
वर्षा2 years ago
राजश्री2 years ago
समीर2 years ago
निकेता 2 years ago
संजना2 years ago
सुनील2 years ago
स्वप्ना2 years ago
गणेश2 years ago
अभिजीत2 years ago
कीर्ती 2 years ago
मनीषा2 years ago
गीता2 years ago
दयानंद2 years ago
मनीषा बी.2 years ago
अनिता2 years ago
विनय2 years ago
प्रसाद2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा