मागील महिन्यात जाहीर झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'जागतिक लोकसंख्या अहवालनुसार' भारताची लोकसंख्या १.४२८ अब्जच्या पुढे गेली आहे, जी चीनच्या लोकसंख्येपेक्षा थोडी जास्त आहे.
गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक लोकसंख्येचा विक्रम आपल्याला खुणावतच होता. अखेर भारतीयांनी तो रेकॉर्ड आपल्या नावे केला. अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! त्रिवार अभिनंदन !!! काहिजण त्रिवार निषेधसुद्धा करू शकतात. मिचमिच्या डोळ्यांच्या चीनला आपण अगदी डोळे झाकून हरवले, हे मात्र खरं 😌
आता जे झालं ते झालं. त्यात कोण कोणाकडे बोट दाखवणार? वेळोवेळी भारत सरकारने लोकसंख्येला आळा घालण्यासाठी बरीच धोरणे राबवली. ८०च्या दशकात तर अगदी दूरदर्शनवर ओरडून ओरडून सांगितलं 'जरासी सावधानी, जिंदगीभर आसानी' पण आपण 'खतरोंके खिलाडी' 💪 मिश्र दुहेरीच्या ह्या खेळात लाजत-लाजत का होईना भारतीयांनी सांघिक विजेतेपद पटकावलेच.🏆
आमच्या पिढीने विक्रम तर आपल्या नावे केला आहे. तो टिकवायचा कि सोडून द्यायचा हे नवीन पिढीच्या हाती आहे. बाकी वाढत्या लोकसंख्येचे फायदे-तोटे गुगलवर सापडतीलच. पण विक्रम टिकवायचा असेल तर इंटरनेटवर वेळ वाया घालवू नका 😜
विलास के.2 years ago
अभिजीत2 years ago
अजित2 years ago
सुनील2 years ago
प्रदीप2 years ago
प्रकाश2 years ago
रविदत्त2 years ago
संजय डी.2 years ago
प्रशांत2 years ago
शैका2 years ago
सुमित2 years ago
संजय के.2 years ago
शैलेश के.2 years ago
दयानंद2 years ago
संतोष एम.2 years ago
अनिल2 years ago
महेश 2 years ago
जतीन2 years ago
अवधूत2 years ago
विलास पी.2 years ago
प्रसाद2 years ago
विजय2 years ago
गणेश2 years ago
दिगंबर2 years ago
विनायक2 years ago
रोहित2 years ago
अक्षता2 years ago
सिद्धेश2 years ago
वंदना2 years ago
उदय2 years ago
जगदीश2 years ago
वैशाली2 years ago
हेमंत2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा