आपल्याकडे वसंतऋतू साधारण फेब्रुवारी महिन्यात येतो, आपले वसंत्रावदेखील ६ फेब्रुवारी म्हणजे ऐन वसंतातच भूतलावर अवतरले. वसंतऋतूत वातावरण Sunny & Pleasant असते असं वर्णन इंग्रजीत केलं जात. सन्नी 🤪म्हटल्यावर वातावरण आल्हाददायक होणं ओघानंच आलं. असो!
शाळेपासूनच वसंताने साधा-भोळा स्वभाव जपला आहे. आडनाव भालेराव असलं तरी वसंतरावांनी मित्रांना कधी भाले (शाब्दिक) टोचल्याचे स्मरत नाही. मित्रांना प्रतिक्रिया देताना आदरणीय, परमप्रिय, माउली, देवा, पांडुरंगा ह्या विशेषणांचा सढळ हस्ते वापर करतात. (कधीकधी तर आपण देवापाशीच बसलो आहोत असा भास होतो. 😍)
आपल्या व्हाटसपग्रुप वर वसंत आणि मिठाई यांचं अतूट नातं आहे. वसंताच्या पोस्टसोबत मिठाईचे फोटो आपोआप पोस्ट व्हावे अशी विशेष सेटिंग त्याला व्हाटसपने दिली आहे.
नोकरीत असतानाच कार्यालयीन व इतर परीक्षांचा अभ्यास, पी. एचडी ची तयारी, कार्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग यात त्याची उत्साही, मेहनती वृत्ती दिसून येते. वसंत ग्रुपमध्ये असल्याने वसंतपंचमीला Vasant Punch Me 👊सारखे पांचट पंच करता येतात. 😝
वसंतरावांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा !!!💐🎂🥳
विलास के.2 years ago
प्रदीप2 years ago
विजय2 years ago
विलास पी.2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा