१४ जून २०२०

गुगल मीटचे मीठ अळणी

संदर्भ: शाळेतल्या वर्गमित्र-मैत्रिणींचे प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नसल्याने 'गुगल मीट' वर ऑनलाईन मिटींगचे आयोजन करण्याचे ठरले. त्या ऑनलाईन भेटीचा वृत्तांत.

कालच्या ऑनलाईन बैठकीत सहभागी झालेल्या मित्र-मैत्रिणींचे आभार! खरं म्हणजे दोन-तीनदा भेटल्यानंतर जवळपास सर्वांचेच जीवनानुभव ऐकून झाल्यानंतर आता बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी काय उरलंय? असं वाटत होतं. पण तसं नसतं! एकदा भेटल्यानंतर दोन-तीन तास कसे निघून जातात कळतच नाही. सांगणं ऐकणं अपूर्णच रहातं. कदाचित हीच मैत्रीची जादू असावी.

कालची भेट गुगल मीटवर करण्याचं ठरलं होतं. पण गुगल मीट वर काही तांत्रिक अडचणी येत होत्या, म्हणजे फक्त १७ जणांना मिटिंग रूममधे प्रवेश दिला जात होता. बाकिचे दरवाजाबाहेर. बरं त्यातील कोण आत आला तर आतला एक खिडकीबाहेर. त्यात अधूनमधून गुगल-मीट राजश्री मॅडमचा माईक बंद करत होते.(मला वाटतं कोणीतरी खोडसाळपणा करत असावं 😉) थोडक्यात गुगल-मीट अळणी होतं. त्यामुळे प्राचार्या वर्षा यांनी तातडीने झूम मिटिंगची व्यवस्था केली. 👍

मजामस्ती करतच मिटिंगला सुरूवात झाली. बरेचजण एकमेकांनां दीर्घ कालावधीनंतर भेटत होते. त्यामुळे तो किंवा ती सध्या काय करते... हे जाणून घेण्याचा कार्यक्रम असणे स्वाभाविक होतं. संतोष एम.ने शाळेनंतर झालेल्या त्याच्या रेल्वेप्रवासाची माहिती दिली. म्हणजे तुम्हां-आम्हांसारखा तिकीट काढून केलेला प्रवास नाही, तो भारतीय-रेल सेवेत कार्यरत आहे. (म्हणजे कायम विदाऊट तिकीट प्रवास! 🚂)

अभयने त्याचा आतापर्यंतचा प्रवास कथन केला. अभय पूर्वी बीपीटी कॉलनीचा रहिवाशी असल्याने व ग्रुपमध्ये बरेचसे बीपीटीकर असल्याने (व काही मुलूंडकर) विषय गंमतीमध्ये थोडा प्रादेशिक अस्मितेकडे सरकला. पण मूळचे सगळे शिवाजीयन्स असल्याचे सत्य नाकारता येत नाही. आम्ही काळाचौकीकर तसे शांत(?) असतो. पण विषय काळाचौकीवर आला की नेत्रा एवढी आक्रमक होते की नेत्राभाई म्हणायला हरकत नाही 😊. तिच्यामुळे आम्ही काळाचौकीवर अगदी सुरक्षित असतो.

शैकाने त्याच्या आयुष्यातील मार्गक्रमणाची फारच मनोरंजक व आशादायक कहाणी सर्वांसोबत शेअर केली. माझे आयुष्य शिक्षण - नोकरी - कौटुंबिक जबाबदारी असं चाकोरीबद्ध असल्याने, ज्या मित्रांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांच मला नेहमीच अप्रूप वाटतं.

सुरेशदादांना स्वपरिचयाची संधी देण्यात आली परंतु सध्या दादांचा दौरा ग्रामीण भागात असल्याने व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही. स्क्रिनवर सुरेशदादा दिसत होते पण त्यांचा आवाज काही आमच्यापर्यंत पोहचत नव्हता. हावभावांवरून तर ते काहीतरी करणी करत असावेत असा भास होत होता. 😂 त्यामुळे त्यांना पुढच्या वेळी स्वपरिचयाची संधी देण्यात येईल.

विविध विषयांवर मित्र-मैत्रिणींकडे असलेल्या ज्ञानभांडाराचं कौतुक वाटतं. जगड्व्याळ शब्द न वापरता रवीदत्तने त्याच्या आयुष्यातील काही कटू अनुभव सांगितले व त्यापासून सावध रहाण्याचे उपायही सांगितले. बरेचसे मित्र दोन तास एकही शब्द न बोलता फक्त ऐकत होते. म्हणजे तुम्हाला कल्पना आली असेल, ऐकण्यासाठी व आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी किती इंटरेस्टिंग विषय होते. मध्येच गीता मॅडम आम्हाला सोशल वर्कचा गृहपाठ देऊन स्वत: गायब झाल्या. असो!

अजूनही बरंच काही होतं मिटिंगमध्ये पण आता आवरतं घेतो. अरे हां! पुणेकर आज शांतच होते. त्यांना मिटिंग संपता संपता प्रसादने शहाणपणाचा टोला लगावून जागे केले. 😘

ओढ ही वेड लावी जीवा...
आता पुढच्या मिटिंगला सगळ्यांनी नक्की येवा!
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

माझे शाळासोबती

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

विनायक5 years ago

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ठ लेखन. पुन्हा पुन्हा वाचला. पहिला परिच्छेद तर फारच आवडला.

संजय डी.5 years ago

संतोष, आतापर्यंत फक्त नावडतीच्या अळणी मिठाचा प्रकार माहित होता. आता गुगलच्या अळणी मीटाच्या माहितीमुळे ज्ञानात भर पडली.
महत्वाचं असं की मित्रांना तास दोन तासच नाही तर दिवसच्या दिवस न बोलता ऐकण्याची (पक्षी ऐकून घेण्याची) सवय झाली आहे. ऊगा जखमेवरची खपली काढू नये.😬😬😬😉

विलास पी.5 years ago

संतू वाणी नेहमी प्रमाणे उत्तम, पण रविदत्त तुझ प्रतिक्रिया लेखन पण खूप छान झालंय.

राजश्री5 years ago

Apratim, सगळ्या कल्पना सुंदर, khodsalpanachi कल्पना तर फारच भावली😜

गणेश5 years ago

संतू, मोजक्या शब्दात पण फारच छान लिहिलं आहेस. 👍 काही कल्पना भन्नाट....मीट अळणी, प्रादेशिक अस्मिता, विदाऊट तिकीट, करणी, नेत्रा भाई.... 😀👌👌👌.

प्रदीप5 years ago

नेहमी प्रमाणे मस्त👌👌 शाब्दिक कोट्या मस्त👌👌 जिते रहो..लीखते रहो..🙏🙏

विनय5 years ago

संतोष, मस्त विनोदी व अप्रतिम लेखन 👌👏🥈

वैशाली5 years ago

आणि 'गुगल Meet चे मीठ ' एकदम चविष्ट 👌🏻

अभिजित5 years ago

नेमके वर्णन.नेहमीप्रमाणेच...👌👌👍👍

रविदत्त5 years ago

संतुवाणी Superb संग्रहणीय 👌👌😍

गीता5 years ago

waaw mast 😊😊😊😊🍫🍫🍫

नेत्रा5 years ago

👏👏😉

प्रसाद5 years ago

व्वा...😍

सुनील5 years ago

Perfect 👍🏼👍🏼👍🏼

दीपक5 years ago

👌👍

नीना5 years ago

Mast 👏👏

वर्षा एस.5 years ago

👌🏻😄

वर्षा डब्ल्यू.5 years ago

👌

समीर5 years ago

👌🏻👌🏻👍🏻
Read more in this section:
वर्गशिक्षक: दहावी-अपी.टी. चा तासआठवणीतील बोंबाबोंब५० मार्कांचं संस्कृतगुगलचे मीठ अळणी७ वा वर्धापनदिनबॉईज ओन्ली - चर्चासत्रप्रसादचे पेनबंधमधली सुट्टीसुगंधी उटणंश्रावणातील स्नेहसंमेलनकन्याशाळेची भिंतस्नेहसंमेलन २०२१@ मुलुंड पोलीस स्टेशनमुलुंड ते काळाचौकी
Close Video ❌
Share