२७ फेब्रुवारी २०२१

निसर्ग मेळा - सो गो परिवार

मुंबई महानगरपालिकेच्या हौशी कलावंतांनी 'मराठी भाषा दिनानिमित्त' सादर केला मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.

सो-गो परिवार, मुंबई महानगरपालिका यांनी २७ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून, मराठी गीतांचा निसर्गमेळा सादर केला त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !🙏

गतवर्षीच्या 'सूर तेच छेडिता' प्रमाणे हा कार्यक्रमदेखील आमच्या जवळपासच्या विभागात असल्याने मी आणि सुनील निसर्गमेळ्यात सामील झालो. म्हणजे अगदी सुरवातीपासून नाही, परंतू मध्यंतरांच्या आसपास. त्यामुळे कार्यक्रमाच्या प्रारंभाचा आनंद घेता नाही आला. पण सो-गो परिवाराची उर्जा कार्यक्रमाच्या आरंभापासून ते अंतापर्यंत कायम असते. किंबहुना उत्तरोत्तर ती वाढतंच जाते. 👍

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या परिस्थिती थोडी कठीणंच आहे. त्यामळे कार्यक्रमाच्या स्वरूपावर बरीच बंधनं होती. श्रोतेवृंदही मर्यादीत होते. ह्यावर्षी तंत्रज्ञानाचा आधार घेत रसिकांसाठी हा कार्यक्रम यू-ट्यूब लाइव्ह वर प्रक्षेपित करण्यात आला. पणं प्रत्यक्ष कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची मज्जा काही वेगळीचं असते. (घरी मोबाईलसमोर बसून शिट्या मारणं, टाळ्या पिटणं आणि आवाज करणे जरा कठिणचं) 😊

कार्यक्रमाची आखणी सो-गो च्या लौकिकाला साजेशीच होती. निसर्गमेळ्याशी संबंधित शब्दांनी सजविलेले रंगमंचावरील चित्र तर खूपचं कल्पक होते. नेहमीप्रमाणे आटोपशीर आणि छान अशी संहिता आणि त्यात गीताचं सूत्रसंचालन. कार्यक्रमाचं निवेदन छान जमू लागलंय गीताला. निवेदन म्हणजे काय तर समोरं ठेवलेले कार्यक्रमाच्या रुपरेषेचं वाचन. ते काय सोप्प असत. (म्हणून सगळ्यांनाच जमणार नाही) परंतु निवेदनाबरोबर प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाला खिलाडूवृत्तीने स्वीकारून कार्यक्रमाची रंगत वाढवणे. ही सूत्रसंचालनाची खासियत आहे. ते गीतामॅडमना मस्तच जमतंय. 😍

प्रतिकूल परिस्थितीत निर्सगमेळयात सामील होणारे गायक आणि प्रेक्षक नक्कीच मराठी गाण्याचे रसिक असणार. सो-गो परिवाराचे सारे गायक छान गातात. अर्थात त्यांना गाता येतं म्हणूनचं ह्या कार्यकमात गाण्याची संधी मिळाली असणारं. (कोणालाही रंगमंचावर जाऊन गाणं सादर करता आलं असत तर माझे एव्हाना किती संगीत-अल्बम निघाले असते!) 🎤🎼

साऱ्याचं कलाकारांची नावं लक्षात नाहीयतं, पण काही गाणी बेस्टंच झाली. 'फुलले रे क्षणं माझे', 'गारवा', 'मन उधाण वाऱ्याचे', 'धुंद एकांत हा', 'काळ्या मातीत मातीत', 'निसर्गराजा ऐक सांगते' तेही साभिनय. 'सांग कधी कळणार तुला', 'शुक्रतारा' ही तर सदाबहार गाणी. 'उषा:काल होता होता' हे समूहगीत तर एकदम भारी सादर झालं. दादा कोंडके यांच्या अवखळ अशा 'ढगाला लागली कळं' ह्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. 👏

वातावरणात कोरोनामुळे मनावर आलेली मरगळ, निरूत्साह झटकून टाकण्याचं काम काही प्रमाणात का होईना पण निसर्गमेळ्याने साध्य केलं.👍

You can Like, Share & Comment
- संतूवाणी

दिनविशेष

तुमची प्रतिक्रिया लिहा

✍️ तुमची प्रतिक्रिया लिहा

Read more in this section:
रात्रीस खेळ चालेवादा तेरा वादावादा - कोथिंबीरीचादिन दिन दिवाळीरंगभूमी दिनधक धक गर्लकालिदास दिनतू फेकताच भाला!सूर तेच छेडितागुरूपौर्णिमा सोशलव्हॅलेंटाइन डेसुहाना सफर - गरबानिसर्ग मेळासुहास शिरवळकरगो-मिठी दिन
Close Video ❌