मी आणि माझे कुटुंब गेली १५ वर्ष भारतात रहात आहोत. (त्यापूर्वी सुद्धा भारतातच रहात होतो 😊) अमेरिकेत एसी घरात बसून पोष्ट लिहायला आवडलं असत. पण एका पोष्टसाठी अमेरिकेला जाणे माझ्या अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही. (औकात आहे का तुझी अमेरिकेला जाण्याची? असही कोणीतरी म्हणेल. असो ! 😬 )
कोरोना प्रकरणात मला आपल्या देशाची तुलना इतर कोणाशी करायची नाहीये.मी सर्वसामान्य भारतीयांप्रमाणे माझी तुलना फक्त माझ्या शेजाऱ्यांशी करतो.(फ्लॅट संस्कृतीमुळे तेही कमी झालय. शेजारी काय चाललयं कळतचं नाही 😊) लॉक-डाऊन मध्ये प्रगत, अतिप्रगत, विकसनशील, मागास अशा विविध पातळीवरील देशांची एकमेकांशी तुलना करणे म्हणजे विंग्रजीत comparing Apples with Oranges.
दुसरी गोष्ट लोकसंख्या. जवळपास १२५ करोड (करोड म्हणजे एकावर म्हणजे किती शून्य बरं?). त्यातही विविध जाती-धर्माचे लोक, त्यांचे सणवार ह्यावर निर्बंध लादणे, तेही अराजक माजू न देता ही सोप्पी गोष्ट आहे का? अगदी कुठल्याही सरकारसाठी...
सर्वसामान्य भारतीय जनता इतकी समंजस आहे कि यथाशक्ती सरकारच्या प्रयत्नांना साथ देत आहे. आता काही अतिउत्साही, विघ्नसंतोषी लोक त्यात खोडे घालतात, पण ते चालायचचं! आम्ही भारतीय युद्धाच्या तयारीत नेहमीच असतो. 😀 मुंबईकरांसाठी सकाळी कामावर जाण्यासाठी लोकलच्या गर्दितून प्रवास करणे किंवा मेट्रो सिटीमधील रस्त्यावरील ट्राफिकमधून प्रवास करणे (भारत x पाक क्रिकेट सामने पहाणे 😂) हे आमच्यासाठी युद्धसदृशचं असत.
अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था ह्यासाठी ठराविक माणसे नेमलेली आहेत किंवा निवडून दिलेली आहेत. ते त्यांची कामे करतील.(नाही केली तर पुढच्या निवडणुकीत बदलू) सारेच काही अर्थतज्ञ होऊ शकत नाहीत ना! आपात्कालीन परिस्थितीत आपण नेहमीच पैशापेक्षा माणसाच्या जीवाला महत्त्व दिलेल आहे.
जनसामान्य त्यांचे दैनंदिन कार्यक्रम आटपून , त्यांचा विरंगुळा समाज माध्यमांवर शोधतात. समाजाच्या सर्व थरातील लोक त्याचा वापर करतात. त्यावरील एखाद्या पोष्ट वरून संपूर्ण समाजाचे मूल्यमापन करणे योग्य वाटत नाही.
प्रगतीचं म्हणाल तर ती आपल्या गतीने होत राहिल. पूर्वी फक्त दूरदर्शन होत, आता शे-दोनशे वाहिन्या आहेत. पहिल्याच प्रयत्नात भारताने Mars Mission यशस्वी केल.... अजूनही बरच काही! 🙏
म्हणजे तुम्ही बुद्धीमान असाल तर message post करत रहा 😀
विनायक5 years ago
नीना5 years ago
गीता5 years ago
विलास के.5 years ago
अभय5 years ago
अभिजित5 years ago
समीर5 years ago
वर्षा डब्ल्यू.5 years ago
संजय डी.5 years ago
सुनील5 years ago
गणेश5 years ago
अवधूत5 years ago
संजय के.5 years ago
दयानंद5 years ago
विकास सी.5 years ago
प्रदीप5 years ago
राजश्री5 years ago
प्रशांत5 years ago
महेश5 years ago
प्रसाद5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा