विद्या विनयेन् शोभते ही म्हण ज्याने सार्थ केली, असा आपल्या वर्गातील हुशार विद्यार्थी. विनय बालपणापासूनच अभ्यासात हुशार. (माझ्यापेक्षाही हुशार म्हणजे तुम्हाला कळलं असेल किती हुशार ते.) दहावीत तर त्याच्या हुशारीचा सत्संग लाभावा म्हणून रविदत्त चक्क वेळेपूर्वी शाळेत आला होता, विनयच्या बाजूची जागा पटकावण्यासाठी.
शाळेत असल्यापासून आजतागायत नम्र आणि मितभाषी स्वभाव कायम ठेवलेला विनय. बोलताना थोडासा अडखळणारा पण गाणं मात्र सुरेल आणि गोड आवाजात गाणारा. शाळेत असताना त्याचा हेवा वाटावा अशी अजून एक गोष्ट म्हणजे त्याच सुंदर हस्ताक्षर. (मोठेपणी तो डॉक्टर होणार नाही, हे तेव्हाच सिद्ध झालं होतं. म्हणजे ज्यांच हस्ताक्षर गिचमिडं असतं ते डॉक्टर होणारच, असं नाही. अन्यथा आपल्या ग्रुपमध्ये डझनभर डॉक्टर सापडले असते.)
विनय नेहमीच अभ्यासात पहिल्या तीन क्रमांकामध्ये असायचा. शालेय जीवनातील विनयबद्दल अजून एक लक्षणीय आठवण म्हणजे त्याने चक्क भूगोलाच्या सरांकडून मार खाल्ला होता. सरांनी फळ्यावर एक वर्तूळ काढलं त्याला विनय हसला. म्हणजे ते वर्तूळ हास्यास्पदचं होत. पण पहिल्या बाकावर बसून सरांना हसणे म्हणजे धाडसच... सर चिडले आणि त्यांनी विनयला फळ्यावर वर्तूळ काढायला सांगितले. विनयने अगदी सहजगत्या छान वर्तूळ काढलं. पण त्याने कितीही छान वर्तूळ काढलं असतं तरी त्याला मार पडणारच होता. सरांनी दुसरे वर्तूळ विनयच्या गालावर काढले. हा प्रसंग लक्षात राहण्याचे कारण भूगोलाचे सर फारसे कोणाला मारत नसतं आणि विनय मार खाणारा रेग्युलर गिऱ्हाईकपण नव्हता. असो! अपवादानानेच नियम सिद्ध होतात.
वाढदिवसाच्या दिवशी सगळंच गोडधोड असत म्हणून ही थोडीशी कटू आठवणं. पण अशाच कटू-गोड आठवणीचं आपलं आयुष्य रूचकर करतात. विनय, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!💐🎂
दयानंद2 years ago
रविदत्त4 years ago
गीता4 years ago
वसंत4 years ago
संजय डी.4 years ago
प्रदीप4 years ago
अवधूत4 years ago
विनय4 years ago
प्रसाद4 years ago
प्रशांत4 years ago
महेश4 years ago
गणेश4 years ago
सुनील4 years ago
विलास के.4 years ago
अभिजित4 years ago
अनिल4 years ago
संजय के.4 years ago
प्रकाश4 years ago
समीर4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा