मुलीच्या विवाहासाठी मुलगा शोधणे ह्यासाठी वरसंशोधन हा शब्द ज्याने कोणी शोधलाय त्याने अगदी समर्पक शोधला आहे. मुलीच्या बापासाठी ते अगदी पी.एच.डी. पेक्षाही मोठं संशोधन असतं. हल्लीच्या काळी प्रेम-विवाहाच प्रमाण थोडं वाढल्याने वरसंशोधनाची तीव्रता कमी झालीय. अरेंज्ड मॅरेजमध्ये तर हि अत्यावश्यक बाब. मुलीच लग्न हा प्रत्येक बापासाठी खूप महत्त्वाचा निर्णय असतो. मुलीचं भावी आयुष्य त्यावर अवलंबून असतं. आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या सुपूर्द करायचा म्हणजे हे संशोधन आवश्यकच असतं.
गंमत म्हणजे आपल्याकडे वयात आलेला प्रत्येक मुलगा हा निर्व्यसनी आणि चांगल्या स्वभावाचा असतो. (म्हणजे अगदी कॉलेजपासून आत्तापर्यंत सिगारेटी फुंकत असला तरी त्याला सिगारेटच व्यसन लागलेलं नसतं) पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती तेव्हा जवळच्या नातलगांमधील लग्नाळू मुलामुलींचा डेटाबेस सहज उपलब्ध असे. आता डॉटकॉम वर उपलब्ध असतो. पण त्याची विश्वासार्हता किती? हा मुख्य प्रश्न असतोच.
वर-संसोधनासाठी प्रथम दुर्बिणीतून काही नग शोधले जातात. प्राथमिक चाचणीत काही रिजेक्ट होतात. उरलेल्यांचा अधिकचा डेटा जमा केला जातो. मध्यस्थ १००% विश्वासू असतीलच असं नाही. मग नातेवाईक, मित्र, इ. गुप्तचरांमार्फत गुप्तपणे अंतर्गत डेटा मागवला जातो. अशा मायक्रोस्कोपिक टेस्टनंतरच बोलणी पुढे सरकतात.
फक्त दहा दिवसांसाठी घरी आलेल्या गणेशमूर्ती सुद्धा जीव लावून जातात. कल्पना करा आपली लाडकी लेकं सासरी पाठवताना वधूपित्याच्या काय भावना असतील! 'दमलेल्या बाबाची कहाणी' किंवा 'दाटून कंठ येतो' ही गाणी खऱ्या अर्थाने मुलीचा बापच अनुभवू शकतो.
विनायक4 years ago
संजय डी.4 years ago
विलास पी.4 years ago
रविदत्त4 years ago
गीता4 years ago
संजय डी.4 years ago
अवधूत4 years ago
समीर4 years ago
अनिल4 years ago
प्रसाद4 years ago
अभिजित4 years ago
दिलीप4 years ago
दयानंद4 years ago
गणेश4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा