१२ ऑगष्ट २०२४

वृंदावन सोहळा !!!

संदर्भ: शाळूसोबतींचे स्नेहसंमेलन वृंदावन रिसॉर्ट !

दहा ऑगष्ट रोजी घटनास्थळी मी नेहमीपणाने गैरहजर असल्याने जे काही लिहीन ते विश्वसनीय (?) सूत्रांनी पुरवलेल्या माहितीनुसार. फोटो आणि व्हिडिओच्या पुराव्यातून जमेल तसा वृतांत मांडण्याचा हा धाडसी प्रयत्न🙏

जो येणारच नव्हता तो अपेक्षेप्रमाणे सर्वप्रथम प्रकट झाला आणि वृदांवन सोहळ्याला सुरुवात झाली. त्याने वाक्चातुर्याची चुणूक दाखवून श्री. शिंंदेना काका बनविले, ज्याचा पुढे एक्सट्रा चहासाठी फायदा झाला.👍 वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करत साधारण दोन डझन नग जमा झाले आणि सुरू झाला एक प्रवास आनंदाचा! 😊

अभयची कराओके सिस्टीम म्हणजे पिकनीकची जान असते. उदयोन्मुख कलाकारांसाठी सुवर्णसंधी ! ह्यावेळी काही नवोदितांनी एका प्रस्थापित कलाकाराचा माईक आवळला. 🎤पण त्याने दुसऱ्या दिवशी दाखवून दिले तो काही 'कच्च्या चेल्यांचा गुरू नाही'. काहीजण गाणी गायले काही बोलले. काही जण स्वतःची चाल, सूर ताल घेऊन गातात 😃 (आत्मनिर्भर) मीपण ह्या प्रकारात मोडतो. गाण गाताना सूर-तालाच बंधन असू नये, अस माझं वैयक्तिक मत आहे. असो! एकंदर मस्तच चाललं होतं. सर्वांनी नाचगाण्यांची हौस पुरवून घेतली.

जयजय शिवशंकर गाण्यात कमनीय बांध्याच्या अवधूतने अफलातून नृत्याविष्कार दाखवला.👌 सुरूवातीला डोक्याला हात लावून बसलेला पुणेरी डॉन त्याच्या हिशोबाने ठुमकला. रविने उल्लेख केल्याप्रमाणे मित्रांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देत निद्राधीन होण्यातील गंमत काही औरच असते.😍

उत्तररात्री मात्र एक अनेखी मैफिल रंगली. चार पट्टीचे गायक आणि एक दर्दी रसिक. शराबी सिनेमातील अमिताभची आठवण करून देणारा. जस त्यात तो अख्खं थिएटर एकट्यासाठी बुक करतो, तसा ह्याने व्हरांडा बुक केला होता. गणेशला बिदागी देखिल दिली. मास्तरांनी तर गीत, शायरी, गझल यांचा फडशाच पाडला म्हणे. तो रसिक मात्र गायकांना पुरून उरला. (आणि उरलेला परतीच्या प्रवासात माझ्या वाटेला आला.🤪)


वृदांवन सोहळा - दिवस दुसरा

खरं म्हणजे पहिला दिवस कधी सरला ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी प्रभातसमयी विनायक आणि संतूवाण्याचे आगमन! हा तुमच्या नशीबातील मणिकांचन योग कि तुमच्या कर्माचे भोग हे तुमचं तुम्ही ठरवा. 😃 वृदांवनी आम्ही मित्रांना शोधत असतानाच गीताचे आमच्याकडे लक्ष गेले आणि तिने आम्हाला तडक कॅफेटेरीयात नेलं. खूप दिवसांनी मित्रमैत्रिणींना भेटून मनाला ताजेतवाने वाटले. तरी शरीरासाठी चहा प्यावाच लागतो. ☕ मी चहाटळ असलो तरी चहा टाळत नाही. 😊

न्याहरी आटपून मुलांच्या कंपूत सामील झालो. गंमती-जमती, गप्पागोष्टी सुरू होत्या. विषयांच बंधन नव्हतं. वसंत आजोबांनी बाळांसाठी प्रेमाने आणलेली काजूकतली चाखली. अवधूतने आम्हाला त्याच्या कॉलेजजीवनात घडलेली भयकथा सांगितली पण आम्ही त्याची हास्यकथा केली.

कोणास आवडू ना आवडू
अवधूत सहनशक्तीचा महामेरु
अर्थात ती त्याचीच कर्मफळू
(जाम बेकार यमक जुळलयू 🤪)

टाईमपास म्हणून ग्लासांचे खेळ खेळलो. मला काय जमलं नाही त्यात. माझं जाऊदे पण भौतिकशास्त्र कोळून प्यायलेल्या मास्तरांचे तिन्ही चेंडू न्यूटनच्या नियमांना फाट्यावर मारून 🫢 एकाही ग्लासाला स्पर्श न करता गेले. मी सहसा डाव्यांची तारीफ करत नाही पण डावखुऱ्या सुनीताला हॅटस् ऑफ!👍 तिने असा काहि दणका हाणला एकाच फटक्यात बरेचसे ग्लास धारातीर्थी पडले. (टेबलपण थोडसं घाबरल होतं 😱). संतोष, सुनील, प्रदीप यांनी खेळात विशेष प्राविण्य दाखवलं. डबलटिबल प्रयत्न करूनही खेळात नीनाला फार काही जमलं नाही. परंतु तिने मेत्रीबंध मधली सुट्टी चा कॅनव्हास तयार करण्यासाठी घेतलेली मेहनत, काबिल-ए-तारीफ! 👍

घरी प्रस्थान करण्यापूर्वी गुरूंनी गुंडाळून ठेवलेली कराओके सिस्टीम काढली आणि त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली.🎤 ते ठिक आहे, पण नेत्रा आणि वर्षाचा गाण्याचा आत्मविश्वास खूपच वाढला आहे. त्याचे काहितरी करायला पाहिजे बुवा 🤪

प्रदीप आणि संजयने दिलेली भेटवस्तू स्वीकारून सोहळ्याची सांगता झाली. हा स्नेह-मेळावा जुळवून आणल्याबद्दल गीता, रविदत्त यांचे अभिनंदन !!!🙏 सहकलाकारांचे सस्नेह आभार.💕 भेटू पुन्हा केव्हातरी !!!
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

माझे शाळासोबती

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

निकेता2 years ago

👌🏻👌🏻 नेहमीप्रमाणे सुंदर संतूवाणी

गीता2 years ago

👌🏻👌🏻 सुंदर ...

नेत्रा2 years ago

As usual👍👌

सुनीता2 years ago

खूप सुंदर मस्त 👌👌👍

सुनील2 years ago

मस्त👍 प्रतिभा आणि प्रतिमा. जबरदस्त 👍

प्रदीप2 years ago

मस्त मित्रा,तुझ्या अष्टपैलू लेखन कलेचे कौतुक करावे तेवढे थोडे..👌👌खूप तंतोतंत वर्णन..👍👌👌 अवधूत ची भयकथा मात्र खरोखर सर्वांना आनंददायी ठरली😄🤣

गणेश2 years ago

मस्त... 👌 जो येणारच नव्हता तो अपेक्षेप्रमाणे प्रकट झाला, हे जाम भारी...😀 यातील वाक्य आणि वाक्य काबीले तारीफ आहे 👌... अतिशय खुमासदार लिखाण संतोष... 🙏

वैशाली2 years ago

छानच👌 नेहमीप्रमाणे मस्त , विश्वसनीय सूत्रांकडून माहिती घेवून सुद्धा 👌

रविदत्त2 years ago

सुत्र भारीच विश्वसनीय आहेत अगदी तपशीलासह बित्तम बातमी कळवितात😀 रसीक प्रेक्षकाने अमीताभने अख्ख थिएटर बुक कराव तसा व्हरांडा बुक केला होता🤣...Love You Santu😘

शैका 2 years ago

सही. संतोष पुढील भाग लवकर please

कीर्ती2 years ago

साधारण दोन डझन नग जमा झाले😂😂😂😂...वसंत आजोबा😝😝😝

समीर2 years ago

😁👍🏽🙏 👍🏽👌👌संतू नेहमीप्रमाणे मस्त,वृंदावनक्षेत्री तुझा लेखणीरुपी वेणू चा नाद असा घुमलाय कि तुझ्या या लेखनतंत्राने आम्ही मुग्ध झालोय अर्थात ते देखील आमच्या चांगल्या कर्माचच फळ‌ असावं ,आभार मित्रा 👌👌🙏🏼

संजय डी2 years ago

आनंदयात्रा मला आठवतंय त्याप्रमाणे आपल्या आनंदयात्रेची सुरुवात सप्टेंबर २०१२ मध्ये झाली. अभ्युदय नगर मधल्या एका हॉलमध्ये आपण सर्वजण भेटलो. दहावी झाल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर प्रथमच सर्वांची भेट झाली होती. विशेष म्हणजे आपल्यावरील प्रेमापोटी शिक्षकही आले होते. आनंदाला अगदी उधाण आलं होतं. कोणा कोणाशी आणि किती किती बोलू असं झालं होतं. आजही त्या स्मृती उर्जा पुरवतात. परतीच्या प्रवासात पुण्याला पिसासारखा तरंगतच आलो. त्यावेळी पण सुनिलने पुढाकार घेऊन हे सर्व घडवून आणले. व्हाट्सअप ची नुकतीच सुरुवात झाली होती. अद्याप गृप बनवण्याची सोय उपलब्ध नव्हती. तरी सगळ्यांना निरोप पोहोचले. नंतर बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेटलो. आनंदाच्या अनुभूतीची पुनरावर्तनं झाली. दरवेळी होणारा आनंद चक्रवाढ व्याजाप्रमाणे अधिकच साठतोय. मधल्या काळात आपल्या पैकी दोन यात्रींनी खुपच घाई केली. फारच पुढच्या मुक्कामाला निघून गेले. जीवन ही एक यात्रा आहे. असेच आपण सर्वजण मिळून ही आनंदयात्रा साजरी करुयात. 👍🥳

प्रसाद2 years ago

😄👌 चहा घेतल्याशिवाय टळत नाही😂

वर्षा एस.2 years ago

😃👊🏻 ...Very Good

संतोष एम.2 years ago

*मस्तच* *लय* *भारी* 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

वसंत2 years ago

खरंच खूप खूप छान सुंदर संतू वाणी

राजश्री2 years ago

काय दैवी देणगी लाभली आहे या मुलाला😇. किती ओघवतं आणि सुंदर लिहितोस रे तू🙇.

अवधूत2 years ago

पुन्हा केव्हातरी नको तू प्रत्येक वेळी हवास आम्हाला. दैवी प्रतिभा लाभलीय तुला. त्याचा आम्हाला आनंद घेऊ दे मित्रा. एकापेक्षा एक सरस लिखाण होतंय तुझ्या कडून. ❤️❤️❤️

नीना2 years ago

Most awaited THE SANTUVANI...👍👍 Great लिखाण...Santu...tusi sachme great ho...🙏
Read more in this section:
वर्गशिक्षक: दहावी-अपी.टी. चा तासआठवणीतील बोंबाबोंब५० मार्कांचं संस्कृतगुगलचे मीठ अळणी७ वा वर्धापनदिनबॉईज ओन्ली - चर्चासत्रप्रसादचे पेनबंधमधली सुट्टीसुगंधी उटणंश्रावणातील स्नेहसंमेलनकन्याशाळेची भिंतस्नेहसंमेलन २०२१@ मुलुंड पोलीस स्टेशनमुलुंड ते काळाचौकीएक मुलाखत - गटप्रमुखांचीसुगंधी उटणं - एक प्रवासपन्नाशी पारची ऊर्जावृंदावन सोहळा
Close Video ❌
Share