आजची ऊत्सवमूर्ती आपले मित्र नरेश दळवी (मूर्तीची ऊंची पावणेपाच फूट 😊)
एखाद्याने उंचीचा फायदा किती घ्यावा? मला आठवतंय आमच्या बिल्डिंगमध्ये Under16 क्रिकेटसामने होते त्यातपण नरेश सहभागी झाला होता. (१८ वर्षाचा असताना 😊) क्रिकेटबरोबर कब्बडी खेळातसुद्धा नरेशला गती होती. तेव्हा आमच्या विभागात कब्बडीचे सामने उंचीनिहायसुद्धा होत. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एकनाथ सोलकर त्यांच्या बिल्डिंगमध्ये रहात असल्याने नरेश स्वत:लाच बेष्ट फिल्डर समजायचा 😆 नरेश एक्की ईलेव्हनचा एक भरवशाचा खेळाडू होता.👍
शाळेत असताना ११ नंबरची मोठी गॅंग होती त्यातलाच हा एक फंटर. शारीरिक उंची आपल्याला नशीबाने मिळते, पण मनाची उंची आपण वाढवायची असते. मूर्ती लहान पण किर्ती महान, अशी अनेक उदाहरणं आपण पहातो. तशीच शाळेत मस्ती करून नरेशने स्वत:ची किर्ती वाढवली. ११ नंबरच्या गॅंगमध्ये विनायक, प्रसाद, ई. सारखे विद्वान मित्र होते पण नरेशची वर्गातली गॅंग अनिल, सुरेश, माधव सारख्या द्वाड मुलांची होती.💪
सध्या नरेश कोकणात काका ह्या नावाने स्थायिक झाला आहे. पण प्रत्येक नवरात्रीत न चुकता देवीच्या दर्शनाला मुंबईत येतो. आता दर नवरात्रीत मुंबईत येण्याचं हेच एक कारण आहे कि तरुणपणीच्या नवरात्रोत्सवातील काही रासलीला आठवतात, हे त्या अंबेमातेला ठाऊक. असो! आपल्याला काय करायचयं? आपण भले आणि आपल्या दांडिया भल्या. 😍
पण नरेश मुंबईत आला की अभ्युदयनगरमध्ये आमचं एक छोटसं गेट टुगेदर होऊन जातं. डॉक्टर अनिल अगदी वेळात वेळ काढून तेव्हा हजर रहातात. आज नरेशला ५१ व्या वाढदिवशी मन:पूर्वक शुभेच्छा !!!. मित्रा तुला सुखासमाधानाचे आयुष्य लाभो! हिच अंबेमातेचरणी प्रार्थना 🙏
विलास पी.5 years ago
प्रसाद5 years ago
विनायक5 years ago
रविदत्त5 years ago
अवधूत5 years ago
गणेश5 years ago
विजय5 years ago
प्रकाश5 years ago
प्रशांत5 years ago
समीर5 years ago
प्रदीप5 years ago
विकास सी5 years ago
अभय5 years ago
नरेश5 years ago
सुनील5 years ago
दीपक5 years ago
विलास के.5 years ago
संतोष एम.5 years ago
अनिल5 years ago
दिगंबर5 years ago
संजय के.5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा