विविध शैक्षणिक बोर्डांचे निकाल लागण्याचे दिवस आहेत. सध्या दहावीबद्दलच बोलू. आजूबाजूला, सोशल मिडियावर ९० किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मार्क्स मिळवणारे बरेचजण आढळतात. ९० हा अंक तोच आहे पण टक्क्यांच्या बाबतीत त्याच महत्त्व कालानुरूप कमी झालयं. (काहींसाठी पुढील आयुष्यात 90-60-30 ह्या अंकांचही वेगळ महत्त्व येऊ घातलेलं असतं)
साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी 90 टक्के गुण मिळवणे ही अनन्यसाधारण बाब होती, आता सर्वसाधारण बाब आहे. अर्थात प्रयत्नपूर्वक अभ्यास करून 90 टक्के गुण मिळवणे ही कधीही कौतुकास्पद आणि अवघड गोष्ट आहे. (सोप्प असतं तर मला नसते का मिळाले 90 टक्के?)
एकूणच शिक्षणक्षेत्रातील बदल, बाजारीकरण, मूल्यांकन पद्धतीतील बदल, विविध बोर्ड व खाजगी क्लासेस, शाळा यांची पुढिल शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी गळाला लावण्याची स्पर्धा अशा विविध गोष्टींचा परिणाम म्हणजे हा मार्क्स फुगवटा! विद्यार्थी म्हणजे ग्राहक असे हे अर्थकारण आहे. मी काही शिक्षणतज्ज्ञ नाहीये, कॉमनमॅनला ज्या गोष्टी दिसतायत त्या मांडतोय. अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे पालक, जे स्वत:ची अपूर्ण स्वप्न पाल्याकडून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचवेळा विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचाच अट्टाहास असतो, " कमीत कमी ९० टक्के मार्क्स मिळालेच पाहिजेत."
मान्य आहे कि आजूबाजूच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकायचं असेल, चांगल आयुष्य जगायचं असेल तर विद्यार्थीदशेत मेहनत करावीच लागेल. ईथेच तर खरी गोम आहे. चांगल आणि सुखी समाधानी आयुष्य म्हणजे काय? याचं गणिती ऊत्तर काढता येत नाही. आनंद हि सापेक्ष गोष्ट असल्याने आनंदी जीवन जगण्याची कला ज्याची त्याने शिकायची असते (हल्ली त्याचेही कोचिंग क्लासेस् असतात)
सर्व ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
नापासांनी खचून जाण्याचे कारण नाही. हा काही जगाचा शेवट नाही. शैक्षणिक परीक्षा आपण देत असतो. पण पुढे आयुष्य तुमच्या ज्या परीक्षा घेणार आहे (त्याही मार्कांशिवाय) त्यात यशस्वी होणं महत्त्वाचं!👍
प्रसाद5 years ago
राजश्री5 years ago
विलास पी.5 years ago
प्रदीप5 years ago
संजय डी.5 years ago
अभय5 years ago
वर्षा एस.5 years ago
विनायक5 years ago
गीता5 years ago
वैशाली5 years ago
सुनील5 years ago
नीना5 years ago
गणेश5 years ago
प्रशांत5 years ago
संजय के.5 years ago
नेत्रा5 years ago
अभिजित5 years ago
संतोष एम.5 years ago
दयानंद5 years ago
समीर5 years ago
अनिता5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा