संजय, मित्रा बरोबर आहे तुझं म्हणणं! उटण्याचा आनंद ग्रॅम मध्ये तोलता येत नाही. फक्त दिवाळी नाही तर मित्रांनी दिलेली भेट कधीही आनंद देऊन जाते (मग ते सुदाम्याचे पोहे का असेनात 😉)
पुणेरी संजूबाबांनी पाठविलेलं उटणंदेखील असेच आनंददायी असते. हां ते असत थोडसंच! पण त्याच वजन खूपचं जास्त असतं. नाहीतर त्या ५० ग्रॅम उटण्याला असं काय सोनं लागलंय! आपण बाजारात जाऊन एक किलो उटणंसुद्धा आणू शकतो (जाऊ नका लगेच बाजारात, किलोभर उटणं संपवायला महिनाभर अभ्यंगस्नान करावं लागेल 😀) आपण खरे भाग्यवान ज्यांना असे मैत्रीबंध लाभलेत. मनाच्या जिव्हाळ्याच्या वर्गात वर्गमित्र कायमच बसलेले असतात, पण ह्या केशरी उटण्याच्या निमित्ताने ते उठतात आणि एकमेकांना प्रत्यक्ष भेटतात. वर्षभरासाठी मैत्रीसुगंध देऊन जातात.
ह्यावर्षीचं बघा ना, करोनाच्या कसोटीच्या काळात उटणं-भेटणं होईल की नाही? ह्याबद्दल साशंकच होतो. संजयला फोन करून विचारणारचं होतो, "बुवा, ह्यावर्षी उटण्याचा काय ?" आणि थोड्या वेळात काळाचौकीला उटणं पार्सल पोहचल्याचा मेसेज आला. (ह्याला टेलिपथी म्हणतात बहुधा ! )
गंमत म्हणजे कोणतंही पूर्वनियोजन न करता, त्याच संध्याकाळी चक्क दहा मित्र भेटले काळाचौकीत. अगदी IPL ची फायनल बघायची सोडून. (पचास ग्राम उटणेकि किमत तुम क्या जानो बाबू ) एरव्ही तीनचार वर्गमित्रांची भेट जमून येणं म्हणजे अवघड काम.
सुनीलकडून उटण्याच पाकीट घेणे आणि खिशात ठेवणे, दोन मिनीटांच काम, पण आम्हाला दोन तास लागले. "भेटू पुन्हा असेचं कधीतरी" असं चार-पाच वेळा म्हणूसुद्धा सर्वजण तिथेच रेंगाळत होते.
घरी जाऊन मी वास्तव मधल्या संजय दत्तचं बेअरींग घेऊन सुगंधी उटणं पाकीट माझ्या मुलाला दाखवतं म्हटलं, "ये देख बेटा, ये है पच्चास तोला"
मुलगा म्हणाला, ते सगळं ठिक आहे. पण दिवाळी पहाटे लवकर उठून उटणं लावून अभ्यंगस्नान करा म्हणजे झालं. 😀
समीर3 years ago
अनिल3 years ago
विनायक3 years ago
गीता3 years ago
संजय के3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा