दहावी बारावीचे निकाल लागले एकदाचे! खूप दिवसांपासून भिजत घोंगड होतं. पालक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. खरं म्हणजे ह्या कोरोनाकाळात ही किशोरवयीन मुलं बऱ्यापैकी जबाबदारीने वागली. काही असतील जरा उनाड. पण एकंदरीत लॉक-डाउन संयमाने हाताळलं. सोप्प नसतं मजा करण्याच्या ह्या वयात स्वत:ला घरात कोंडून ठेवणं.
आता रिझल्ट लागल्यावर अजून एक गमंत. रिझल्ट विचारणारा टक्के विचारतो आणि ८५/९०./९५ असे टक्के ऐकल्यावर एक कुत्सित हास्य उमटतं. तोंडदेखलं "अरे व्वा !" म्हंटल जात आणि मनात 'च्यायला कोरोनामुळे मिळाले, नाहीतर एवढे कुठले मिळायला' अगदी त्या विचारणाऱ्याला स्वत:च्या काळी ४० टक्के मिळाले असले तरी. काही वाक्य सर्रास ऐकू येतात. "कोरोनामुळे खिरापतीसारखे मार्क्स वाटलेयतं" , "अमक्या अमक्याला एवढे मार्क्स मिळालेयत, एवढा काय हुशार नव्हता " , "मजा आहे बुवा पोरांची, फुकटचे पास झाले." ( सगळेच लोक नाही पण काही असतात...)
मला वाटतं आता जे झालय ते बदलता येणार नाहीय मग ते स्वीकाराना. यात त्या विद्यार्थ्यांची काय चूक आहे? त्यांच्या आनंदावर का विरजण टाकायचं? कोरोनामुळे ही निकालपद्धती ठरवली, त्याला विद्यार्थी काय करणार? हां, आत्ता जे खरंच हुशार आणि मेहनती विद्यार्थी होते त्यांचा हिरमोड झाला असेल. कारण त्यांच्या यशाला विनाकारण कोरोनाची कुबडी लागलीय. परीक्षेत पास होण्याचा आनंद वेगळाच असतो. विद्यार्थी आणि पालक यांनी लोकांकडे लक्ष न देता साजरा करा आनंद....! 👍🍫
कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना
विनायक4 years ago
राजश्री4 years ago
संजय डी.4 years ago
विलास के.4 years ago
समीर4 years ago
संजय के.4 years ago
प्रसाद4 years ago
गीता4 years ago
सुनील4 years ago
अभिजित4 years ago
प्रदीप4 years ago
महेश4 years ago
गणेश4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा