आला परतुनी! म्हणजे हा कुठे गेला होता? बोंबला आत्ता! गेले पंधरा दिवस मी सोशल मीडियावर काहीच पोष्ट केलं नाही, हे देखिल बऱ्याचं जणांच्या लक्षात नाही आलं. मी आपला उगाचं समजत होतो की माझ्या अनुपस्थितीत सोशल मिडियावर पोकळी वगैरे निर्माण झाली असेल. 🤦♂️असो! तसही ह्या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात ना माझी गणती ना तुमची. पण प्रत्येकाचं स्वत:चं अस एक छोटसं विश्व असत. त्यात कोण असणार वा नसणार, हे जो-तो स्वत: ठरवतो.
अरे मूळ मुद्दा बाजूला राहीला. तर त्याच झाल असं की खूप काळजी घेऊनसुद्धा तब्बल एक वर्षांनंतर आजारी पडलोच. आमच्या फॅमिली डॉक्टरांच्या निदानाप्रमणे आजार साधा बॅक्टेरीयल फिवर. पण सध्या त्या नतद्रष्ट कोरोनाने कुठलाचं आजार हा साधा ठेवला नाहीय. अगदी साधा खोकला आणि ताप आला तरी, वर चित्रगुप्ताने आपला पाप-पुण्याचा हिशोब लावायला घेतला आहे अस वाटतं.
आजारपणात मदतीसाठी जिवलग सोबत होतेच. संकटकाळी देवही आठवायला लागले. देवालासुद्धा माहित असतं हा 'कामापुरता मामा' कॅटेगरीतला भक्त आहे. बरा झाला की परत स्व-मार्गाला लागणार. परंतु दयावान ईश्वर त्याच्या लेकरांमध्ये भेदभाव करीत नाही. आजारपणात सर्वात कठिण असते, स्वत:च्या मनाला समजावणे. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती
मनशक्ती ही खूप प्रभावशाली गोष्ट आहे पण ती वापरण्याच तंत्र अवगत असायला हवं. पॉझिटिव्ह थिंकींग अर्थात सकारात्मक विचारांमध्ये खरोखरचं खूप सामर्थ्य असत.
बरं जे काय असेल ते, आता बरा तर झालोय, पुन्हा लागतो कामाला सोशल मिडिया समृद्ध करायच्या 😝तुम्हीसुद्धा काळजी घ्या, सुरक्षित रहा!
वरची टिप: चित्रगुप्तमहाराज तुम्ही बाकीची पेंडिंग काम आटपून घ्या आणि माझी फाईल वर आली असेल तर जरा खाली ढकला. माझीपण पृथ्वीतलावर खूप काम पेंडिंग आहेत. 👍
विलास के.4 years ago
संजय डी4 years ago
विनायक4 years ago
गीता4 years ago
अवधूत4 years ago
गणेश4 years ago
प्रसाद4 years ago
वर्षा एस.4 years ago
राजश्री4 years ago
नीना4 years ago
महेश4 years ago
अनिल4 years ago
दयानंद4 years ago
समीर4 years ago
अभिजित4 years ago
विकास सी.4 years ago
शैलेश के.4 years ago
सुनील4 years ago
दिगंबर4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा