आपला पहिला वाढदिवस खूपच उत्साहात साजरा केला जातो. पण तेव्हा आपल्याला फारसं समजत नसतं आणि आत्ता तेव्हाच आठवतही नाही. सालाबादप्रमाणे वाढदिवसातलं नाविन्य कमी होतं पण वयानुरूप आपल्या वाढदिवसा सोबत वेगवेगळे संदर्भ आणि आठवणी जोडल्या जातात. वाढदिवसाची तारीख विसरण्याइतकं वय होत नाही तोपर्यंत जोशात वाढदिवस साजरा करायचा.
मी मात्र फारसा सोशल नसल्याने घरीच वाढदिवस साजरा करतो. कधी कधी वाढदिवसात सरप्राइज देखिल गंमत आणतात. मलाही आज मिळणार होतं एक सरप्राइज. थोडक्यात वाचलो! आमच्या धाकट्या चिरंजीवांनी त्याच्या मम्मीकडून संध्याकाळचा वाढदिवसाचा प्रोग्राम विचारून घेतला. खूष झाला! मला म्हणतो, "तुमच्यासाठी आज संध्याकाळी सरप्राइज आहे." मी आपला बसलोय अंदाज लावत.
संध्याकाळ झाली दर वाढदिवसाप्रमाणे मला औक्षण केलं गेलं. गोडधोड खाल्ल. मी आपला चिरंजीवांकडे आशेने बघतोय सरप्राइजसाठी. तो म्ममीकडे बघतोय. शेवटी कंटाळून त्याने मम्मीला विचारलं, "तू तर सकाळी म्हणाली होतीस संध्याकाळी पप्पाचं ऑक्शन करणार"
थोड्याशा संभ्रमानंतर घोळ लक्षात आला. "अरे गधड्या औक्षण आणि ऑक्शन उच्चारायला थोडेफार सारखे असले तरी, त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत." मला प्रकर्षाने एका गोष्टीची जाणीव झाली इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांना थोडे थोडे सांस्कृतिक डोस पाजणे आवश्यक आहे अन्यथा कधीतरी चुकून जाहिर ऑक्शन व्हायचा आपला.
जाता जाता सौ. नी गंमतीत टोला हाणलाच, "पन्नाशीतल्या तुझ्या पप्पाला ऑक्शन मध्ये घेणार तरी कोण?" 😍
वंदना3 years ago
प्रदीप3 years ago
अभिजीत3 years ago
संतोष एम3 years ago
विनायक3 years ago
प्रशांत3 years ago
संजय के3 years ago
गीता3 years ago
दयानंद3 years ago
नीना3 years ago
समीर3 years ago
प्रसाद3 years ago
संजय डी.3 years ago
वर्षा3 years ago
मनीषा बी.3 years ago
नेत्रा3 years ago
सुनील 3 years ago
रविदत्त3 years ago
मनीषा3 years ago
वर्षा एस.3 years ago
राजश्री3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा