समीर पाटील, हा फक्त आडनावाचा पाटील. त्याने शाळेत असताना कधी पाटीलकी दाखवली नाही. पण त्याच्या नावाप्रमाणे त्याचा स्वभाव मात्र आहे. समीर - थंड हवेची झुळूक. कवीमनाचा , थोडासा हळवा आणि मनस्वी. डाव्या बाजूने होणारे शाब्दिक हल्ले मनाला लावून घेणारा. आम्ही ग्रुपवर त्याला शीघ्रकवी म्हणून ओळखतो.
शाळेत लंगडी, डॉजबॉल सारख्या स्पर्धांमध्ये तो आमच्या वर्गाचा प्रमुख खेळाडू होता. चपळ तर एवढा होता कि त्याला मी बिजली म्हणून चिडवत असे. (अजूनपण एक कारण होतं 😉) खूप आठवणी आहेत समीर सोबतच्या. सुनीलला आठवत असेल , समीर त्याच्या एरियात मिळणारं एक मस्त चॉकलेट घेऊन येत असे, त्याच नाव आम्हाला माहीत नव्हतं, पण आम्ही आमच्या बालसुलभ बुद्धीनुसार त्याला गांजा म्हणत असू. अगदी शाळेपासूनच आम्ही नशा करतोय... मैत्रीची!
समीरसोबत माझे आणि सुनीलचे विशेष ऋणानुबंध आहेत. मी, सुनील आणि समीर सातवीपर्यंत आमचं एक खास त्रिकुट होतं. एकदम टॉम अँड जेरी टाइप दोस्ती. कितीवेळा कट्टी-बट्टी झाली असेल! मला तर वाटत माझ्या आणि सुनीलच्या त्रासाला कंटाळून समीरने आठवीपासून शाळा बदलली. 😘
त्यानंतर आम्ही जवळपास तीस वर्ष समीरचा शोध घेत होतो. ऊशीराने का होईना पण सापडला. ते कायतरी म्हणतात ना, "अगर किसी चीजको शिद्धावाटपसे चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है" 😍
समीर, मित्रा तुला सुखी-समाधानी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
विनायक4 years ago
सुनील4 years ago
विलास पी.4 years ago
नीना4 years ago
गीता4 years ago
विलास के.4 years ago
प्रशांत4 years ago
अनिल4 years ago
प्रकाश4 years ago
संतोष एम.4 years ago
अभिजित4 years ago
महेश4 years ago
वर्षा एस.4 years ago
प्रदीप4 years ago
दयानंद4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा