महेश ज्याला महेशसर असेही म्हटले जाते. 'सर' हा 'किताब त्याला कसा मिळाला याची इतिहासात सध्यातरी नोंद नाही. होईल पुढेमागे. ग्रुपवर शैक्षणिक क्षेत्रातील ताज्या बातम्या आपणांस महेशकडून मिळतात.
आमची वांगणी येथील पिकनिक यशस्वी करण्यात महेशसरांचा मोठा वाटा होता. आतापर्यंतच्या पिकनिकमधील सर्वात जास्त मित्रांची उपस्थिती त्या पिकनिकला होती. महेशसरांनी कॅप्टन कुक बनून तिथे स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडली होती. अर्थात सोबत इतरही बल्लवाचार्य होते.
सातवीला तांत्रिक विषय घ्यायचे म्हणून शिवाजी विद्यालय सोडून एलफिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये प्रवेश.(आमच्याकडून मिळणाऱ्या मांत्रिक ज्ञानाला मात्र मुकला) सोमैया कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी.
त्यानंतर गोदरेज, जिंदल, मायनी ग्रुप (बेंगलोर), पॉंडेचरी, तमिळनाडू, एमआयडीसी(जेजुरी) अशा विविध ठिकाणी नोकरी. आफ्रिका, इटलीमध्येही काही वर्ष नोकरी केली (तरीही इटालियन पंतप्रधान नको). गोदरेजमध्ये असताना अंतर्गत परीक्षा देऊन एम बी ए साठी स्कॉलरशिप प्राप्त (शाळेत चौथीमध्येही शिष्यवृत्ती मिळाली होती). सीनियर जनरल मॅनेजर पदावरून स्वेच्छानिवृत्ती आणि सध्या व्याख्याता ह्या भूमिकेत.
हिंदू धर्मावर अतूट श्रद्धा. मराठी, इंग्रजी, गुजराती भाषांवर प्रभुत्व. संस्कृत, आफ्रिकन (स्वाहिली), इटालियन, कन्नड, तमिळ थोडंफार. जुनी हिंदी-मराठी गाणी बहुतांशी तोंडपाठ आहेत आणि चालीवर गाण्याचा मोडका-तोडका प्रयत्नसुद्धा करतो. तबला-वादनाची आवड. महेश बाहेर भलेही लोकांना लेक्चर देत फिरत असेल पण घरच्या कोर्टात मात्र त्याचे युक्तिवाद चालत नाहीत कारण वहिनी हायकोर्टात वकील आहेत. महेशचा मुलगा शुभंकर डॉक्टर (फिजियोथेरेपी) असून सद्या मास्टर्स करीत आहे.
महेश गेली अकरा वर्ष कॉर्पोरेट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे. (म्हणजे काय? ते थोडक्यात सांगता येणार नाही). व्यवसायानिमित्त देशविदेशात भ्रमंती सुरु असते. परंतु ह्या सर्व बाबींपेक्षा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महेश २००५ पासून पुण्यात स्थायिक आहे. 👨🎓
महेश, तुला पुन्हा एकदा शुभेच्छा आफ्रिकन भाषेत...झिंगालाला हुंम झिंगालाला हुंम झिंगालाला हुंम हुर्रर्र हुर्रर्र !!! 🙌
प्रदीप4 years ago
वसंत4 years ago
संजय के.4 years ago
राजश्री4 years ago
गणेश4 years ago
प्रशांत4 years ago
नरेश4 years ago
अभिजित4 years ago
समीर4 years ago
प्रकाश4 years ago
दिलीप4 years ago
दिगंबर4 years ago
नेत्रा4 years ago
विलास के.4 years ago
प्रसाद4 years ago
अनिल4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा