पिकनिकला जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र आमच्या गृहमंत्र्यांकडून मिळवण्याचा माझा असफल प्रयत्न. तसं बघायला गेलं तर घरी मला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. भारतीय संविधानाने मला व्यक्तिस्वातंत्र्य दिलेलं आहे. तरी पण 😊
काही मित्रांना वाटतं असेल, ह्यां! परवानगी कशाला घ्यायची? कुठे जातोय ते सांगायचं आणि निघायचं. माझ्याबाबतीत पण आधी तसंच होतं. पण कोरोना आला आणि सूत्र बदलली. कोरोना येण्यापूर्वी आमच्या घरी मी राजा होतो. म्हणजे आतापण राजाच आहे पण बुद्धिबळातला. एकच घर चालायची मुभा असलेला. त्यामुळे मला फक्त घर आणि गॅलरी एवढीच स्पेस आहे.
माझ्या वेंधळेपणाबद्दल बायकोला एवढी खात्री आहे कि मी घराबाहेर पडलो तर कोरोना घेऊनच येणार. ( करीना आणायची तर काय आपली हिम्मत नाय ब्वॉ ) माझ्या वेंधळेपणाबद्दल मलादेखिल आत्मविश्वास असल्याने मी ह्या निर्णयाविरुद्ध अपील पण केलं नाही. तस अधूनमधून पॅरोलवर बाहेर जाता येतं, पण ठराविक हद्दीपर्यंत... आणि हे सगळं माझ्या आणि परिवाराच्या काळजीपोटी असतं त्यामुळे निर्बध पाळावेच लागतात. माझे कुटुंब माझी जबाबदारी ! त्यात मला दोन महिन्यांपूर्वी तापदेखील आला होता.
परंतु आता इतक्या वर्षांनी मित्र-मैत्रिणी भेटणार तर काहीतरी प्रयत्न करावेचं लागणार ना? हळू हळू वातावरणनिर्मिती करायला सुरुवात केली. आमचं संभाषण असं झालं.
मी : आमच्या शाळेतल्या मित्रांचं गेट-टूगेदर करायच ठरलय. फक्त वन डे आहे.दुसऱ्या फेरीच्या संवादात मी माझं ग्रुपमधील खोटंखोटंच महत्त्व पटवून दिल. माझं तिथे असणं किती आवश्यक आहे ते सांगितलं. गृहमंत्र्यांच्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल वगैरे आश्वासन दिल. मग गृहमंत्र्यांकडून अंतिम निर्णय आला. "सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जाऊ नये, अस माझं मत आहे. बाकी तुम्ही काय ते ठरवा."
आता लग्नाला बरीच वर्ष झालेल्या मित्रांना माहित असेल, अशा प्रसंगी आपण काही ठरवणे किती डेंजरस असते. मी देखील सावधगिरीचा उपाय म्हणून जड अंतःकरणाने पिकनिकचा बेत रहित केला. 😞
विलास के.4 years ago
विनायक4 years ago
रविदत्त4 years ago
गीता4 years ago
विलास पी.4 years ago
विनोद4 years ago
प्रसाद4 years ago
प्रदीप4 years ago
राजश्री4 years ago
संजय के.4 years ago
समीर4 years ago
दयानंद4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा