३१ डिसेंबर २०१८

🥳 ३१ डिसेंबर, रात्रीस खेळ चाले 🍾💥🎊

दरवर्षी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जाते तो दिवस उगवला ३१ डिसेंबर! भारतात शहरी भागात हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. हळूहळू ग्रामीण भागातही याचा प्रसार होत आहे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा वर्षाचा शेवटचा दिवस, इंग्रज लोकांपेक्षा भारतीय लोकं मोठया उत्साहाने साजरा करतात. विशेषतः पुरुषवर्ग ह्या दिवशी खूप उत्साहात असतो. (महिलावर्ग ज्या उत्साहाने मंगळागौर साजरी करता त्यापेक्षा अधिक उत्साहाचे वातावरण पुरुषवर्गामध्ये असते 😀)

साधारण एक महिना/आठवडा आधीपासून थर्टीफर्स्ट नाईट साजरी करण्याचे प्लॅन आखले जातात. नोकरी करणारा पुरुषवर्ग ऑफिसमधून लवकर पळण्याचे किंवा दांडी मारण्याचे बहाणे तयार करून ठेवतो. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणवर्गाला सुट्टीचे काही टेन्शन नसते, फक्त पार्टीसाठी पालकांची परवानगी मिळवणे एवढेच कार्य पार पाडायचे असते.

"पप्पा मी पार्टीमध्ये ड्रिंकस करणार नाही, प्रॉमिस. आमच्या मध्ये कोण पिणारे नाहीत" अशा थापा मारून मम्मी-पप्पाला लाडीगोडी लावून परवानगी मिळवली जाते. अर्थात आपल्या चिरंजीवांचे मित्र किती संस्कारी आहेत ते पप्पालाही माहित असत. (पप्पाही कधीतरी तरुण असतो 👍) थोडेसे आढेवेढे घेत परवानगी देऊन टाकतो.

काहीजण परिवारासोबत थर्टी फर्स्ट नाइट साजरी करतात, म्हणजे फॅमिली गेट-टूगेदर. हा थोडासा सोज्वळ प्रकार असतो. त्या पार्टीतसुद्धा मज्जा येते, परंतु जास्त Happening थर्टीफर्स्ट मित्रांच्या पार्टीत असते. थर्टी फर्स्ट नाइट हा वर्षातील शेवटचा दिवस, आयुष्यातले एक वर्ष संपणार म्हणून मित्र खूप दु:खी झालेले असतात. आजच्या काळात दुःख निवारण करण्याचा सोपा उपाय म्हणजे मद्यप्राशन!

बहुतेक थर्टी फर्स्ट पार्टीमध्ये मद्य हा मुख्य घटक असतो, त्या भोवतीच पार्टीची आखणी केलेली असते. ह्या पार्टींमध्ये जे दारू पित नाहीत त्यांना चूxx (चुकीचे) समजले जाते. पण प्रत्येक पार्टीमध्ये असे चुकीचे मित्र असतात, पार्टीनंतर मित्रांना नवीन वर्षात बरोबर पोहचवण्याची जबाबदारी ह्या चुकीच्या मित्रांवर असते.

थर्टी फर्स्ट नाइटला रात्री बारा वाजेपर्यंत जागे राहणे आवश्यक असते नाहीतर नवीन वर्ष आले हे समजत नाही. घड्याळात बाराच्या ठोक्याला सगळीकडे फटाक्यांची आतषबाजी होते. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत होते. जे लोक आधीपासुनच दारूकाम करत असतात ते, त्यांना जमेल तस नवीन वर्षाचं स्वागत करतात, म्हणजे काहीजण स्वतःच्या पायावर उभे राहून , काहीजण बसून तर काही चक्क जमिनीवर लोळून.

चला तर मग आता थर्टी फर्स्ट नाइट साजरी करून नववर्षाचं स्वागत कसे करायचे ते ठरवा.

चिअर्स मित्रांनो !🍻

You can Like, Share & Comment
- संतूवाणी

दिनविशेष

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

शैका3 years ago

नेहमी प्रमाणे मस्तच !

अनिता3 years ago

Excellent....👌👌

विनायक3 years ago

व्वा. फारच छान
सुंदर, एक्दम मार्मिक वर्णन

अवधूत 3 years ago

परमात्म्याचे खोडकर खट्याक (हा अवतार पाषाणाऐवजी लेखणीने खळ्ळ् खट्याक करणारा आहे) अवतार म्हणजे आमचा स्कूल(कूल कूल)बडी संत्या होय. वैश्य वाणी कुलोत्पन्न असूनही शब्दांच्या मापात कधीही पाप न करणारा सच्चा दुकानदार. हा समोरच्यांच्या अवगुणांच्या पुड्या अशा दिमाखदार कागदात बांधून गिऱ्हाईक बनवणारा की गिऱ्हाईकांसही वाटावे की ह्या वाण्याने आपणास वारंवार बनवावे.

नीना3 years ago

Cheers Santosh🍻

मनीषा3 years ago

छान लिखाण 👌🏻👌🏻

अनिल3 years ago

👌👌✔️👍

अमर3 years ago

👌🏻

गणेश3 years ago

उत्कृष्ट...

प्रिया3 years ago

👌👌👍

जतीन3 years ago

👍🏻👍🏻 छान मस्त लिहिले आहे👌👌🍾🍾
तुमच्या चिरंजीवांनी 31 ची परमिशन मागितली वाटते😛 आणि न पिणारे चुकीचे कोण🤣

संदेश3 years ago

🤣👌

पल्लवी3 years ago

👌👌

दर्शना3 years ago

👍👍

विजय3 years ago

👌🏻👌🏻

ललित3 years ago

संतूवाणी खूप छान 👍🏻👍

चारू3 years ago

👌👍

अनिल जी.3 years ago

मस्त!!👌👌

विलास पी.3 years ago

👌🏼👌🏼👌🏼

समीर3 years ago

👍🏼🙏🏻संतू तुझा खेळ अविरत चालो 👍🏼👍🏼💐

दयानंद3 years ago

मस्तच संतू...👌👌👌

अभिजीत3 years ago

👍👍👌

प्रदीप3 years ago

मस्त💁🏻‍♂️👌
Read more in this section:
रात्रीस खेळ चालेवादा तेरा वादावादा - कोथिंबीरीचादिन दिन दिवाळीरंगभूमी दिनधक धक गर्लकालिदास दिनतू फेकताच भाला!सूर तेच छेडितागुरूपौर्णिमा सोशलव्हॅलेंटाइन डेसुहाना सफर - गरबानिसर्ग मेळासुहास शिरवळकरगो-मिठी दिन
Close Video ❌
Share