'गीता डांगे', शाळेनंतर हे नाव अंधुकसं आठवत होतं. मधली सुट्टी स्थापन होण्यापूर्वी कधीतरी ऐकिवात होतं कि गीता ही व्यावसायिक नाटकांतदेखील काम करते. कधीकाळची आपली शाळूसोबती अभिनेत्री आहे, हे ऐकून तेव्हा छान वाटलं होत. मानवी स्वभावानुसार मनात तिची एक इमेजपण तयार झाली होती (अभिनेत्री म्हणजे थोडीशी गर्विष्ठ, भावखाऊ, नाटकी वगैरे 😊)
त्यांनतर 'मधली सुट्टी' ग्रुपमध्ये सामील मित्रमैत्रिणींचे एकमेकांच्या स्वभावाचा अदांज घेत संवाद सुरु झाले. अजूनही गप्पागोष्टी अंदाजपंचेच सुरु आहेत. कौन, कब, कैसा वागेगा? सांगनेको नही सकता 😀 हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है!
'वादा तेरा वादा' ह्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण गीताने ग्रुपवर पाठवलं. त्या कार्यक्रमाला आम्ही काही मित्र आवर्जून उपस्थित राहिलो. इतक्या वर्षांनंतर गीताला ओळखणे मला तरी शक्य नव्हते. परंतु कार्यक्रमाच सूत्रसंचालन तीच करत असल्यामुळे ती गीता (बडबड गीता) आहे हे समजलं. मध्यंतरात आम्ही रंगमंचावर जाऊन तिची भेट घेतली. तेव्हा जाणवलं, अरे हि तर आपल्यासारखीच आहे...सामान्य (वागण्या-बोलण्याला) त्यानंतर मात्र ती फक्त बालपणीची वर्गमैत्रीण गीता होती.👍 (अभिनेत्री वगैरे स्टेजवर 😊)
मनमोकळ्या स्वभावामुळे सर्वांशीच तिचे सूर जुळले. विशेषत: ग्रुपमधील सुरेल गायकांशी! चित्रकला, गायन, अभिनय ह्या क्षेत्रातील तिच्या कलागुणांची प्रचिती मधली सुट्टीत आपल्याला आली आहेच. गीता शिक्षकीपेशात असल्याने कधी कधी आपल्याला शिकवण्याचे विफल प्रयत्नदेखील करते.😄 बाकी जिचे नावचं गीता आहे तिला मी काय उपदेश करणार? एवढचं म्हणेन तुझी बडबड अखंड सुरु राहो! बडबड गीताय नम:
प्रदीप2 years ago
राजश्री2 years ago
प्रसाद2 years ago
रविदत्त2 years ago
अवधूत2 years ago
संजय डी.2 years ago
सुनीता 2 years ago
दयानंद2 years ago
सुनील2 years ago
प्रीतम2 years ago
निकेता 2 years ago
संतोष2 years ago
वर्षा एस.2 years ago
विजय 2 years ago
नेत्रा2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा