साधारण २००० सालातील गोष्ट असेल. सिविल इंजिनीअर होऊन तो महापालिकेची कंत्राटे घेत होता. अशाच एका कामासाठी पालिकेतील डेप्युटी इंजिनिअर साहेबांनी त्याला श्री. चव्हाणसाहेबांची भेट घ्यायला सांगितली. त्याप्रमाणे तो सगळी कागदपत्र घेऊन साहेबांना भेटायला गेला. औपचारिक ओळख, कामाचे स्वरूप इत्यादी पार पडलं. दोघंही इंजिनिअर, मग बोलता बोलता कुठल कॉलेज, रहायला कुठे इत्यादी विषय आले. तो काळाचौकीला राहत होता. साहेबपण पूर्वी काळाचौकीत राहायचे. विषय शाळेवर आला. दोघांची शाळा एकच..शिवाजी विद्यालय. दहावीचं वर्षही सेम. च्या..मारी धमालच झाली. एवढ्या वेळांनंतर त्यांना कळलं, दहावीला ८५-८६ साली ते दोघे एकाच वर्गात होते. तो विजय जयसिंग देसाई आणि साहेब म्हणजे विकास विठ्ठल चव्हाण. सुखद योगायोग! 😍
दहावीत असताना विकास आमच्या पुढच्याच बेंचवर बसायचा. डाव्या हाताने वहीत लिहणे आणि उजव्या हाताने डोळ्यावर येणारी जुल्फे सावरणे अशी विकासाची लकब अजूनही लक्षात आहे. अपेंडिक्स (आंत्रपुच्छ) ह्या छोट्याशा अवयवयाचा उपयोग आम्ही तेव्हा विकासाला चिडवण्यासाठी करत असू. तशी त्या वयात मुलांना समज जरा कमीच असते म्हणा. (वय वाढल्यावर समज वाढतेच असही नाही 😉) अपेंडिक्सचा अपभ्रंश होऊन पुढे तो पंडित झाला. विकास मुंबई महानगर पालिकेच्या पा. पु. विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहे. (पा. पु. म्हणजे पाणी पुरवठा नाहीतर काहीजण उगाच कल्पनेचे घोडे दौडत बसतील)
आम्ही शाळेत असताना जेव्हा भाड्याच्या सायकली फिरवत असू तेव्हा त्याच्याकडे स्वत:ची छानशी सायकल होती. (मीपण तेव्हा नवीन सायकल घेणार होतो पण पार्किंगचा प्रॉब्लेम असल्याने बेत रहीत केला 😀) सध्या विकासचे वास्तव्य नवी मुंबईत आहे. आता योगायोगाने आम्हाला चव्हाणसाहेब कधी भेटतील बघू. जास्त काही लिहीत नाही, नाहीतर साहेब आमचा पा. पु. बंद करतील. 😂
वैशाली3 years ago
दयानंद3 years ago
मनीषा बी.3 years ago
वसंत3 years ago
प्रदीप3 years ago
रविदत्त.3 years ago
अभिजीत3 years ago
संजय डी.3 years ago
विनायक3 years ago
अवधूत3 years ago
प्रकाश3 years ago
समीर3 years ago
प्रशांत3 years ago
विकास सी.3 years ago
गणेश 3 years ago
अनिल3 years ago
सुनील3 years ago
प्रसाद3 years ago
नरेश3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा