आयुष्यात आपल्याला अनेक गुरू लाभतात. पण आपल्या बालपणीचे गुरुजन आपल्या विशेष जिव्हाळ्याचे असतात. चार दशकांपूर्वी आम्ही शिवाजी शिक्षणोत्तेजक मंडळाच्या, काळाचौकीस्थित प्राथमिक शाळेच्या शेवटच्या वर्षी असताना, आम्हाला सौ. सुधा गोकर्ण ह्या वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या. त्या एका वर्षात त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यावर अशी काय जादू केली की आम्ही अजूनही त्यांना विसरू शकत नाही.
ते वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष होते. पूर्ण वर्षभर बाईंनी आमचे अनेक कार्यक्रम नियोजित केले होते. आमचं एक नाटुकलं आकाशवाणी वर नेलं. शाळेत आमच्या कलाकृतींच प्रदर्शन भरवलं. हे सगळं करत असताना आमच्या शैक्षणिक प्रगतीकडे पण पूर्ण लक्ष ठेवलं. त्या वर्षी बाईंच्या जवळजवळ १० ते १२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा यश मिळालं. त्यांच्या ध्येयवादी कर्मयोगामुळे प्रभावित आम्ही विद्यार्थी, चार दशकानंतरही त्यांच्या संपर्कात आहोत.
गेल्या गुरूपौर्णिमेला मग आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या बरोबर एक आभासी बैठक आयोजित केली. बाईंचे विद्यार्थी आता कुणी डॉक्टर , कुणी वरिष्ठ पोलिस अधिकारी, कुणी मोठ्या इंजिनीयरींग कॉलेजाची मुख्याध्यापिका, कुणी शैक्षणिक विभागप्रमुख , काही अभियंते, काही संगणक तज्ञ, काही शिक्षक आणि बरेच जण व्यावसायिक आहेत . पण सगळ्यांनी वेळात वेळ काढून या बैठकीला हजेरी लावली.

जवळ जवळ तासभर बाईंबरोबर जुन्या आठवणी जाग्या केल्या. गोकर्णबाई तशा प्रेमळ पण शैक्षणिक बाबीत "वज्राहून कठीण!" त्या सगळ्या आठवणी जागवल्या . बाईंची स्मरणशक्ती अजूनही दांडगी, त्यामुळे बैठकीला जास्तच खुमारी आली. त्यांच्या स्नेहवर्षावात पुन्हा एकदा डुंबताना, 'बालपणीचा काळ सुखाचा' याचं प्रत्यंतर आलं.
आमच्या पैकी काहींना बाईंच्या शाळेनंतरच्या उपक्रमाची पण माहिती मिळाली. त्यांनी शाळेबाहेर सुद्धा पददलित आणि उपेक्षितांसाठी शेक्षणिक उपक्रम चालवले, याची बऱ्याच जणांना कल्पना नव्हती . त्यांना त्यांच्या विविध उपक्रमाबद्दल महापौर पुरस्कारही मिळाला होता.
अवधूत5 years ago
नीना5 years ago
विलास के5 years ago
गीता5 years ago
संतोष बी.5 years ago
नेत्रा5 years ago
रविदत्त5 years ago
दयानंद5 years ago
वैशाली5 years ago
अनिता5 years ago
सुरेश5 years ago
राजश्री5 years ago
दिगंबर5 years ago
प्रदीप5 years ago
गणेश5 years ago
मनीषा5 years ago
विजय5 years ago
शैक5 years ago
वर्षा डब्लू.5 years ago
प्रशांत5 years ago
संध्या5 years ago
संजय डी.5 years ago
समीर5 years ago
मनीषा5 years ago
प्रसाद5 years ago
स्वप्ना5 years ago
नितीन5 years ago
संतोष एम.5 years ago
विनय5 years ago
सुनील5 years ago
प्रकाश5 years ago
अभिजीत5 years ago
संजय के.5 years ago
विनायक5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा