१६ मे २०२०

शेरो शायरी - गणेश बखर

- गणेश शेट्ये
संदर्भ: "हॅलो मित्रांनो , आज कुछ लिखते है I हां ... हां सही जान गये हो , पहचान गये हो | आओ चलो हो जाये कुछ शायरी आज I लब्ज जो भी हो मराठी हिंदी उर्दू चाहे गुजराती की बरसात I बस...... सच्ची बात, दिल की बात उतर आये उस शायरी में आज...."
गीताने ग्रुपवर शेरोशायरी पोष्ट करण्यासाठी पाचारण केले आणि शायरीचा भडीमार झाला ग्रुपवर. माझ्यासारख्या टिनपाट शायरांनीदेखील दोनचार मरतुकडे वाघ मारले. त्या शायरीचे गणेशने बखरसदृश केलेलं वर्णन.
ज्येष्ठ शुद्ध तृतीया. प्रात: प्रहरी गितोजी डांगे महाराजांनी खाश्याना पाचारण केले.
"जा आणि मुलुख मैदान मारून या", गीतोजी कडाडले.
सरदार तिरिमिरिने उठले आणि चाल करून गेले. सामोरी भोसले सरदार, पश्चिमेकडून धुमाळ तर पूर्वेकडून मसुरकर यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. सहस्त्र कवनांचा भडीमार झाला.
संतोजी, गणोजी, हिर्लेकर यांनी दुबळा प्रयत्न केला. सावंत सरदार यांचा प्रतिसाद काही कामी आला नाही. चोहोबाजऊ जोर इतका जाहला की त्यांचा काही पाडाव लागला नाही.
मध्यानही पुणेकर सरदार वामकुक्षी साठी गेल्याचे कळताच दस्तुरखुद्द गितोजि ताज्या फौजेनिशी दाखल झाले. पाटील, पूजा, परब या ताज्या दमाच्या सरदारांनी उरल्या सुरल्यांस नेस्तनाबूत केले.
बाजार बुणगे आल्या पाऊली मागे गेले.
भुर्के सरदार यांच्या विवाहे वारषीकी हा विजय प्राप्त झाले करून त्यांस अपार संतोष जाहला. सर्वांसी त्यांनी पुःख्खा झोडण्यास आवतले.
संबंधित लेख:
सोबर गब्बर पूर्वार्ध
सोबर गब्बर..उत्तरार्ध
गणेश, वाढदिवसाच्या शुभेच्छा
You can Like, Share & Comment

मित्र-साहित्य

तुमची प्रतिक्रिया लिहा

✍️ तुमची प्रतिक्रिया लिहा

Read more in this section:
सोबर गब्बरकाय म्हणतो पाऊसगणेश बखरगुरुभेटकैफ़!
Close Video ❌
Share