गब्बर आता काहीसा थकला आहे. पूर्वीची तडफ आता त्यात राहिली नाही. आता पूर्वीसारखे धारदार डाकू सहज मिळत नाहीत. इतर क्षेत्रात आता डाकूगीरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात हे समजल्याने डाकुंची नवीन पिढी आता कॉर्पोरेट, राजकारण, व्यवसाय, ब्यांका, सरकारी यंत्रणा अशा ठिकाणी कार्यरत आहेत. तशात सरकारने गेली कित्येक वर्षे इनाम रक्कम "पुरे पचास हजार (GST सकट)" इतकीच ठेवल्याने गब्बर ला आता पार दारिद्य्र रेषेखालील असल्यासारखे वाटते. इतकी कमी ईनामी रक्कम कुणाला दिली तर त्याचे घर कसे चालणार या विचाराने तो अधिकच कासावीस झाला. मग त्याला रडू कोसळले.
हुंदके देऊन, स्फुंदून स्फुंदुन, हमसाहमशी, ओक्साबोक्शी असे चार प्रकारे रडून झाल्यावर त्याला हलके वाटले. (गब्बर फक्त हसतो आणि थुंकतो असे समजणाऱ्या लोकांच्या गालावर ही एक चपराक आहे. असो !)
इतर डाकू यांची अवस्था तर अजून वाईट होती. त्यांना पाच वेळा पकडले तर एक असे प्रमाण सरकारने इनामासाठी जाहीर केले.
तशात "डरोना 20" नामक नवीन साथ गावात आली. (पुण्यात तोंडाला वस्त्रे बांधून फिरणाऱ्या स्त्रीवर्गाला पाहून चीनने ही नवीन व्हायरसची फ्याशन आवृत्ती बाजारात आणली असे म्हणतात. आणखी एकदा असो.)
तर विनाकारण फिरणाऱ्या डाकू मंडळींची वाहने प्रशासनाने जप्त केली आणि त्यांना पायी परत पाठवले. याकारणास्तव डाकू मंडळींची फारच कुचंबणा झाली. त्यात कुरिअर सेवा आणि ऑनलाईन पण बंद. त्यामुळे लुटीचा माल कसा आणायचा हा यक्षप्रश्न उभा राहिला. मग काही डाकू स्वगृही स्थलांतरित झाले.
शैका3 years ago
संतोष बी.6 years ago
विलास पी.6 years ago
समीर6 years ago
विलास के.6 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा