२२ जून २०२०

बॉईज ओन्ली - चर्चासत्र पुढे सुरू

संदर्भ: बॉईज ओन्ली - चर्चासत्राचा भाग दुसरा. पहिला भाग

मिटिंग सुरू झाल्यानंतर अधिकृत विषय ठरला नसल्याने काय बोलावे हा यक्षप्रश्न होता? आपल्याकडे वक्त्यांची कमी नाही पण तरीही अशावेळी रविदत्तचा संभाषणानुभव कामी येतो. त्याचा गोष्टीवेल्हाळ स्वभाव व नशीला आवाज ऐकायला मजा येते.

अवांतर गप्पा मारल्यानंतर विषय फक्त प्रौढांसाठी ह्या क्षेत्रात गेला. चादरीतील सादरीकरण, म्हणजेच ह्या वयातील परफॉरमन्स प्रेशर यावर साधक-बाधक चर्चा झाली. (म्हणजे बाधकच होती) त्या चर्चेदरम्यान ग्रुपवरील दोन ऍक्टिव्ह मेंबर्सची कमी जाणवली. म्हणजे ओशोंच्या संभोगातून समाधीकडे ह्या ऊक्तीनुसार अनिल आणि वसंताची आठवण होणे स्वाभाविकच होतं. एक आपण बनवलेला डॉक्टर, दुसरा होऊ घातलेला डॉक्टर. माऊली वसंता मात्र मित्रांच्या हाकेला ओ देऊन आले, डॉ. अनिल काही उपलब्ध होऊ शकले नाहीत.

योगायोग म्हणजे फादर्स डे च्या आसपास आमच्या चर्चेचा विषय वडील आणि मुलांमधील पिढीप्रमाणे बदललेला नातेसंबंध होता. सारीच चर्चा इथे उद्युक्त करत नाही. पण चर्चा नक्कीचं उद् बोधक होती. वादविवाद स्पर्धा नसल्याने मित्रांनी आपापली मतं मनापासून मांडली. आपल्या पिढीच्या जडणघडणीत वडिलांचा एक आदरयुक्त दरारा असे त्यामुळे वडिलांबरोबर मतांची देवाणघेवाण फारशी होत नसे, पण प्रसाद आणि रवी ह्याबाबतीत भाग्यवान!.

कालपरत्वे प्रत्येक पिढ्यांमध्ये जीवनमूल्यांचे महत्त्व, संदर्भ बदलत जातात. अभिजीतने मांडलेल्या अनुभवाप्रमाणे आता आपण अशा वयात पोहचलो आहोत जिथे आपण आपल्या वडिलांना पण सल्ला देऊ शकतो आणि आपल्या मुलांना पण! (दोघेही गंभीरपणे ऐकत नाहीत हा भाग वेगळा)

विलास के ने त्याचा एक वैयक्तिक Real Life Scenario मांडला. त्यावर प्रत्येकाने आपापले मतप्रदर्शन केले. त्यावेळी जाणवले की आपण एखाद्या समस्येकडे विविध दृष्टिकोनांतून पाहू शकतो आणि प्रत्येक दृष्टिकोन योग्यही असू शकतो.

कोविड१९ समस्येबाबतही चर्चा झाली. जे WFH न करता प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन काम करतायंत त्यांना कशा प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय , त्यातून आपण काय शिकलं पाहिजे याची माहिती मिळाली.

अधूनमधून अशा चर्चासत्रांची आवश्यकता आहे कारण जसं रविदत्त वारंवार म्हणतो, हे ज्ञान तुम्हाला MBA मध्ये मिळणार नाही.

You can Like, Share & Comment
- संतूवाणी

माझे शाळासोबती

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

समीर6 years ago

एकूणच हा बिनबायकांचा तमाशा सवाल जबाबात रंगला आणि तू पण फार रंगवून सांगितलस त्याबद्दल वाण्या 👍🏻👍🏻👏🏻👏🏻🙇🏻‍♂️

प्रशांत6 years ago

संतोष, नेहमी प्रमाणेच उत्तम.. 👌👌👌... पुढे सुरू ची वाट बघतोय... 🙏🙏

रविदत्त6 years ago

संतोष the great Observer 👌👏👏

संजय डी.6 years ago

संतोष, नेहेमीप्रमाणे अगदी उस्फुर्त असुनही, पुर्वरंगावर काही प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. माझी चूक पोटी घालावी. (तेव्हढच वाढलं तर वाढलं तुझं पोट 😬)
पण त्यामानाने उत्तररंग फारसा रंगला नाही असं काहीसं वाटतय (दरवेळी सिक्वल तितकाच बहारदार असतोच असं नाही.) खर तर तुला लिहीण्याची आता आवड निर्माण झाल्याचं जाणवतय. असाच शोधक नजरेने वेगवेगळे विषय टिपून आम्हाला पर्वणी द्यावीस. 👍

दयानंद6 years ago

Very good लै भारी 👌🏻👌🏻👌🏻

अवधूत6 years ago

सुंदर 👌🏻

अभिजित6 years ago

👍👍👍 अप्रतिम

अभय6 years ago

मस्तच!!

संजय के.6 years ago

अतिसुंदर 😀👍

विनायक6 years ago

Sahi hai boss

गणेश6 years ago

Matter of fact... 👌👍

वसंत6 years ago

खूप खूप छान सुंदर वर्णन संतुवाणी

प्रसाद6 years ago

मस्त संतोष! 😍

अनिल6 years ago

👍👍👍

विलास के.6 years ago

👍

सुनील6 years ago

👍🏼👍🏼👍🏼
Read more in this section:
वर्गशिक्षक: दहावी-अपी.टी. चा तासआठवणीतील बोंबाबोंब५० मार्कांचं संस्कृतगुगलचे मीठ अळणी७ वा वर्धापनदिनबॉईज ओन्ली - चर्चासत्रप्रसादचे पेनबंधमधली सुट्टीसुगंधी उटणंश्रावणातील स्नेहसंमेलनकन्याशाळेची भिंतस्नेहसंमेलन २०२१@ मुलुंड पोलीस स्टेशनमुलुंड ते काळाचौकीएक मुलाखत - गटप्रमुखांचीसुगंधी उटणं - एक प्रवासपन्नाशी पारची ऊर्जावृंदावन सोहळाअंधार चाळ ते ईका इलिटासअभिषेक लॉन -झूईंग ४२०
Close Video ❌
Share