२४ मार्च २०२०
♥ कल्पना विस्तार ♥
(* खालील प्रसंगात वर्णन केलेली पात्रं पूर्णत: काल्पनिक आहेत)दहावी अ बोंबाबोंब प्रसंगात मॉनिटर
संजय धुमाळ ऐवजी
मुन्नाभाई संजूबाबा मुख्यध्यापकांना भेटले आणि दोघांमध्ये झालेला हिंदी-मराठी
सुखसंवाद: - संजू: सर वो अपने पंटर लोगों से जो गलती हुयेला है ऊसके लिये रायटिंग में सॉरी लेके आयेला है. बोले तो ऊनका गलती नहि है. ईतका वेळ वर्गमें कोईच आया नहि ईसलिये वो लोग थोडा बोंबाबोंब किया
- सरः ते काही नाही. म्हणून काय तुम्हि शाळा डोके पे लेंगा? प्रत्येकी शंभर रूपये दंड आणि कल पालकको लेके आना पडेगा. शिस्त म्हणजे शिस्त!
- संजू: सर शंभर रूपये थोडा ज्यादा हो रहेला है, थोडा कम करो ना सर
- सरः 😡 गाढवा , मूर्खा भाजी मंडईत आला आहेस का? मी तुम्हाला शिक्षा देतोय. भाजी विकत नाहीय
- संजू: ईतना कायको भडक रहेला है मामू. मै ईधर विनम्र से बात करेला है और तुम आपुनका ईन्सल्ट किये जा रहा है. थोडा रिस्पेक्टसे बात करो आपुनभी वर्गाचा मॉनिटर है
- सरः रिस्पेक्ट ? तुम्हाला सर्वांना शाळेसे बाहेर काढना मंगता था.
- संजू: ए मामू, क्यू सर घुमा रहेला है, साला अभी आपुनपे बापूके विचार का पगडा है ईसलिये शांतीसे बात कर रहेला है, वर्ना सर्किट तो बोल रहा था, केबिनका दो चार काँच फोड देते है और सारे बैंच मैदानमें लाके रखते है. और मैदानमेंच पढते है. अभीभी पंटर लोग नीचे खडेला है खडे लेके. (आता मात्र मुख्यध्यापक थोडे टेन्शनमध्ये आले . न जाणो ह्या दगड्यांचा काय भरवसा. ऊगाच नस्ती झंझट व्हायची)
- सरः ठिक आहे ये तुमरेकी पहिलीच चूक आहे आणि तुम गयावया कर रहा है म्हणून दंडामध्ये थोडि सवलत देतो. प्रत्येकी पाच रूपये आणि पालकांना घेऊन येणे
- संजू: डिस्काऊंट के लिये थँक यू सर. लेकिन पाच रूपये के लिये पालकको क्यों तकलीफ देनेका. आपुन खुद लेके आयेगा. वैसेभी हमारा गृहपाठ तो हमीच करते है ना पालक नही करते.
- सरः बर ठिक आहे. पण सर्वांचा माफीनामा पाहिजे म्हणजे पाहिजे.
- संजू: थँक यू सर. हम लोग वापस ऐसा गलती नहि करेगा. (थोडा वेळ विचार करून) सर मै क्या बोल रहेला है, आपुन सब विद्यार्थी ये पाच-पाच रूपये वर्गणी देगा उसकी पावती मिलेगा क्या?
- सरः 😡 मूर्खा ती वर्गणी नाही. चुकिची शिक्षा आहे आणि आता तू ती पण देऊ नकोस. बाहेर चालता हो आणि घरी जाताना लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन जा. तुम्हारा शालेय शिक्षण समाप्त हुआ
You can Like, Share & Comment
- संतूवाणी
तुमची प्रतिक्रिया लिहा